गणेशोत्सवासाठी २ हजार २०० जादा बसेस सोडणार, २७ जुलैपासून आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:20 PM2019-07-20T12:20:51+5:302019-07-20T12:22:15+5:30

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २ हजार २०० जादा बसेसची सोय केली आहे. ही माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

2 thousand 200 more buses to leave for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी २ हजार २०० जादा बसेस सोडणार, २७ जुलैपासून आरक्षण

गणेशोत्सवासाठी २ हजार २०० जादा बसेस सोडणार, २७ जुलैपासून आरक्षण

Next
ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी २ हजार २०० जादा बसेस सोडणार २७ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात

रत्नागिरी : गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २ हजार २०० जादा बसेसची सोय केली आहे. ही माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

यावर्षी लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने २ हजार २०० बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार असून, येत्या २७ जुलै (एक महिना अगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यावर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण एकाचवेळी म्हणजे २७ जुलैपासून करता येणार आहे.

२० जुलैपासून ग्रुप बुकींगला सुरूवात

गणपती उत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटाने बस आरक्षित करतात. गेली कित्येक वर्ष एसटी या चाकरमान्यांना त्यांच्या मुंबईतल्या घरापासून ते कोकणातील त्यांच्या वाडी वस्ती व गावापर्यंत सुखरूप आणि सुरक्षितपणे नेऊन सोडत आली आहे. अशा गट आरक्षणाला (ग्रुप बुकिंगला) २० जुलैपासून सुरुवात होत आहे.

१४ ठिकाणाहून जादा बसेस सुटणार

२८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील १४ बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिक-ठिकाणी वाहन दुरुस्ती पथके (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार असून, प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.

Web Title: 2 thousand 200 more buses to leave for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.