गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरिता १२ कोटी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:55 PM2021-02-10T16:55:00+5:302021-02-10T16:56:03+5:30

Ganpatipule Mandir Funds Ratnagiri- गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरिता २०२०-२१ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेला १२ कोटी रुपयांचा निधी शासनाच्या नियोजन विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे वितरीत करण्यात आला आहे. तसा अध्यादेश सोमवारी या विभागाकडून जारी करण्यात आला.

12 crore fund for Ganpatipule Pilgrimage Development Plan | गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरिता १२ कोटी निधी

गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरिता १२ कोटी निधी

Next
ठळक मुद्देगणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरिता १२ कोटी निधी पायाभूत सुविधांसाठी पहिला टप्पा उपलब्ध, कामांना गती येणार

रत्नागिरी : गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरिता २०२०-२१ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेला १२ कोटी रुपयांचा निधी शासनाच्या नियोजन विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे वितरीत करण्यात आला आहे. तसा अध्यादेश सोमवारी या विभागाकडून जारी करण्यात आला.

गणपतीपुळे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १०२.२८६१ कोटी रुपयांच्या आराखड्याला नियोजन विभाग शासन निर्णय दि. २६ फेब्रुवारी, २०१९ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. या आराखड्याअंतर्गत गणपतीपुळे येथील विविध विकासकामांसाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५९,६०,६१,००० एवढा निधी २०२० -२१ साठी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ११,९३,१२,२०० इतका निधी जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून वितरित करण्यात येत असल्याचा अध्यादेश सोमवारी काढण्यात आला.

या निधीतून पर्यटनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बांधकामांसाठी एकूण १०२ कोटींच्या निधीपैकी ५९,६०,६१,००० एवढा निधी चालू वर्षात मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ११,९३,१२,२०० (एकूण आराखड्याच्या २० टक्के) निधी जिल्हा प्रशासनाकडे वितरीत करण्यात आला आहे. त्यातून लवकरच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली जाणार आहेत.

५३ बांधकामांचा समावेश

गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकासासाठी नियोजन विभागाने मंजूर केलेल्या १०२ कोटींच्या आराखड्यात ५३ विविध बांधकामांचा समावेश आहे.

Web Title: 12 crore fund for Ganpatipule Pilgrimage Development Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.