दापोली, मंडणगडमधील सुपारीचे १०० हेक्टर बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:31 AM2021-04-11T04:31:42+5:302021-04-11T04:31:42+5:30

दापोली : दापोली मंडणगड तालुक्यातील सुपारीचे सुमारे १०० हेक्टर क्षेत्र निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्यामुळेे पूर्णत: बाद झाले आहे. बाजारात पाठवण्यासाठी ...

100 hectares of betel nut in Dapoli, Mandangad | दापोली, मंडणगडमधील सुपारीचे १०० हेक्टर बाद

दापोली, मंडणगडमधील सुपारीचे १०० हेक्टर बाद

Next

दापोली : दापोली मंडणगड तालुक्यातील सुपारीचे सुमारे १०० हेक्टर क्षेत्र निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्यामुळेे पूर्णत: बाद झाले आहे. बाजारात पाठवण्यासाठी येथील कोणाकडेही सुपारी शिल्लक नसल्याने बागायतदारांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती सुपारी खरेदी संघाचे अध्यक्ष व कृषी बाजार समिती रत्नागिरीचे संचालक मधुकर दळवी यांनी दिली.

जून २०२० या महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा दापोली, मंडणगड या दोन तालुक्यांना मोठा फटका बसला. नारळ, सुपारीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. दापोली व मंडणगड तालुक्यात सुपारीचे १०० हेक्टर क्षेत्र असून, राजापूर, गुहागर, रत्नागिरी या तीन तालुक्यात सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावर सुपारीची लागवड आहे. दापोली आणि मंडणगड तालुक्यातील बागायतदारांकडे सुपारी नसल्यामुळे येथील बागायतदार पूर्णत: नुकसानग्रस्त झाले आहेत. राजापूर, गुहागर व रत्नागिरी या तीन तालुक्यांमधूनच १०० ते २०० हेक्टर क्षेत्राची सुपारी गुजरात येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्यामुळे दापोली, मंडणगडमधील सुपारीची झाडे जमीनदोस्त झाली. यामुळे बागायतदारांची लाखोंचे नुकसान झाले. दापोलीतील सुपारी ही प्रामुख्याने गुजरात पाठवली जाते. मात्र यंदा बाजारात पाठवण्यासाठी बागायतदारांकडे सुपारीच नाही. दापोली, मंडणगड तालुक्यातील सुपारी बागायतदारांना स्थिती पूर्ववत होण्यासाठी अजून वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.

Web Title: 100 hectares of betel nut in Dapoli, Mandangad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.