weekly horoscopes 2 june to 8 june 2019 | आठवड्याचे राशीभविष्य - 2 जून ते 8 जून 2019
आठवड्याचे राशीभविष्य - 2 जून ते 8 जून 2019

मेष

 

हा आठवडा आपल्यासाठी विशेष असा अनुकूल नाही. त्यामुळे आपणास सावध राहावे लागेल. आपणास भागीदारीतून लाभ होईल. नवीन ओळखी होऊन त्यांच्याशी संबंध जुळतील. आपणास वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. वेळेवर कामे करा व आजचे काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती सोडा. नोकरीत वरिष्ठांच्या नकारात्मक वर्तणुकीमुळे निराशा पदरी पडण्याची शक्यता आहे. व्यापारात ग्राहकांमुळे काही नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रतिस्पधी सुद्धा त्रास देऊ शकतात... आणखी वाचा

वृषभ

महिन्याचा प्रथम आठवडा आपल्यासाठी अनुकूलतेचा आहे. आठवड्यात आपले संपूर्ण लक्ष पैशांवरच राहील. कामाच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तसेच तेथील आपल्या सहकाऱ्यांचे सुद्धा अपेक्षित सहकार्य मिळेल. आपण आपणास जवळचे असणाऱ्या लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल. आपण लोकांकडून आपली कामे करवून घेऊ शकाल व अवघड कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल... आणखी वाचा

मिथुन

हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. कोणतेही काम पूर्ण न झाल्याने आपण बेचैन व्हाल. एखाद्या गोष्टीत वाद झाल्याने आपण योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. मात्र, हळू हळू आपल्या मनातील समस्या दूर होऊ लागतील. ह्या आठवड्यात आर्थिक लाभ होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात व्यापारी सुद्धा चांगली कामगिरी करू शकतील. शत्रूंवर मात करू शकाल. काही तरी नवीन करण्याची इच्छा होईल व त्यासाठी आपण प्रयत्नशील सुद्धा राहाल... आणखी वाचा

कर्क

हा आठवडा आपल्यासाठी अनुकूलतेचा आहे. व्यापार - व्यवसायात व नोकरीत शांत राहून काम करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. कोणत्याही सूचनेवर विचार करून मगच विश्वास ठेवावा. एखाद्या चुकीच्या माहितीच्या आधारे आपल्या हातून चुकीचे काम होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपणास बक्षिसी किंवा लहानसा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र, प्राप्तीच्या प्रमाणात खर्चाचे प्रमाण वाढणार आहे... आणखी वाचा

सिंह 

हा आठवडा आपल्यासाठी अनुकूलतेचा आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण आपणास अनुकूल होईल व वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. मात्र, या आठवड्यात आपणास आपल्या कष्टाचे यथोचित फल प्राप्त होणार नसल्याने आपणास आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल. खर्च करण्याच्या सवयीमुळे आपले नुकसान होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अनुकूलतेचा आहे. कुटुंबीयांचा सहवास आनंददायी राहील... आणखी वाचा

कन्या

हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. ह्या दरम्यान थोडे सावध राहणे हितावह ठरेल. व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन लाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे. नोकरी करणार्यांना नवीन उद्दीष्टे मिळू शकतात. प्राप्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, ह्या आठवड्यात अनावश्यक खर्चामुळे आपण त्रासून जाल. कोणत्याही प्रकारे होणाऱ्या त्रासा पासून सुटका करून घेण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. परदेशाशी केलेल्या व्यापारातून सुद्धा लाभ होऊ शकतो... आणखी वाचा

तूळ 

आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. भागीदारीत आपणास यश प्राप्ती होईल. मात्र, कोणावरही अति विश्वास ठेवल्याने आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. आठवड्यात कोणतेही नवीन काम करताना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आपल्या कर्तृत्वाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांची तोंडे बंद करू शकाल. आर्थिक स्थिती हळू हळू आपणास अनुकूल होऊ लागेल... आणखी वाचा

वृश्चिक

आठवडा आपल्यासाठी महत्वाचा आहे. या आठवड्यात जितके जास्त कष्ट कराल तितके अधिक यश मिळेल. ह्या आठवड्यात आपण आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहाल. मात्र, आठवड्याच्या मध्यास काही समस्या उदभवल्या नंतर आपल्या कामगिरीत सुधारणा होईल. आपण आपल्यातील सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न कराल. कोणत्याही बाबतीत बारकावे बघूनच महत्वपूर्ण निर्णय घ्यावा. व्यापार वृद्धीसाठी आपणास गंभीरतेने विचार करावा लागेल... आणखी वाचा 

धनु

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. कोणताही निर्णय घेताना आपणास त्रास होऊ शकतो, त्यामुळे आर्थिक बाबीत कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नये. कामाचा व्याप वाढल्याने आपणास मानसिक त्रास होईल. मात्र, नवीन कामाची सुरवात करण्यास हा आठवडा चांगला आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. ह्या आठवड्यात आपणास अनावश्यक खर्च नियंत्रित ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपले मन विचलित होऊ देऊ नका... आणखी वाचा

मकर

आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आर्थिक लाभ होतील. मात्र, बाहेरील कामात सावध राहणे आपल्या हिताचे होईल. नोकरीत आपली उद्दिष्टे सहजपणे आपण पूर्ण करू शकाल. आर्थिक बाबतीत वडिलांकडून सुद्धा लाभ होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागेल. वैवाहिक जोडीदाराशी संबंधात गोडवा टिकून राहील. कुटुंबियांशी संबंधात सौहार्द राहील. एखाद्या खास मित्राचा सुखद सहवास घडेल. कुटुंबीय किंवा मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल... आणखी वाचा

कुंभ

आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. व्यापारात वृद्धी होण्याची शक्यता आहे. विरोधकांवर मात करू शकाल. कामात यशस्वी होऊ शकाल. ह्या आठवड्यात सहल, खरेदी किंवा मनोरंजन ह्यावर खर्च होऊ शकेल. भागीदारीत ख़ुशी जाणवेल. आपणास विरोधकांशी वादात न पडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात त्रास होईल, कारण त्यांचे मन स्थिर नसेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. कुटुंबात सुख - शांती नांदेल... आणखी वाचा

मीन

आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. कोणत्याही नवीन कामाची सुरवात करण्यास हा आठवडा अनुकूल आहे. हाती घेतलेल्या कामात हळू हळू यश प्राप्ती होईल. एखाद्या कामात घाई केल्याने आपणास त्रास होईल. ह्या आठवड्यात मानसिक चिंता असल्याने आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही. कामाच्या व्यापामुळे आपण चिंतीत व्हाल. आर्थिक बाबतीत घाई करू नये. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. अभ्यासावर त्यांचे लक्ष केंद्रित होऊ शकेल... आणखी वाचा 

 


Web Title: weekly horoscopes 2 june to 8 june 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.