आठवड्याचे राशीभविष्य - 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2020, 'या' राशीच्या व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 09:01 AM2020-10-04T09:01:48+5:302020-10-04T09:08:32+5:30

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

weekly horoscope 4 october to 10 october 2020 | आठवड्याचे राशीभविष्य - 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2020, 'या' राशीच्या व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल

आठवड्याचे राशीभविष्य - 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2020, 'या' राशीच्या व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल

Next

मेष 

 

या आठवड्यात आपण व्यवसाय व संबंध यात समतोल साधण्यात यशस्वी व्हाल. स्वभावात थोडा उग्रपणा राहण्याची शक्यता असल्याने संयमित राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ग्रहस्थिती आपल्या व्यापार व व्यवसायास अनुकूल असून आपणास काही फायदा मिळवून देणारी आहे. आठवड्यात कष्टाचे फळ मिळत असल्याचे आपणास जाणवेल व अनेक दिवसांपासून जो नफा मिळण्याची अपेक्षा आपण बाळगून आहात ती पूर्णत्वास जाईल. आपण जोमाने पुढील वाटचाल कराल. आर्थिक नियोजनात काहीशी अनिश्चितता निर्माण होणार असल्याने खर्चाची तरतूद करून ठेवावी. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी आशादायी आहे. मात्र, प्रवेश किंवा भावी अभ्यासा विषयी निर्णय घेताना काहीसा असमंजसपणा असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या सुरुवातीस समाजात आपली विशेष ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. कौटुंबिक जीवनात सुद्धा बदल घडवून आणण्यासाठी हा आठवडा महत्वाचा आहे. हा आठवडा अधिक नियोजनपूर्वक काम करण्यासाठी उत्तम आहे. वैवाहिक जोडीदाराशी अर्थपूर्ण चर्चा करून समस्यांचे निराकरण होऊ शकेल. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रणयी जीवनाकडे आपला कल अधिक होईल. ह्या आठवड्यात ध्यान - धारणा, प्राणायाम इत्यादींशी संबंधित पद्धतीचा वापर करून आपण रोगमुक्त होऊ शकाल. आपल्या काही संवयी दूर करण्यात आपण यशस्वी व्हाल.

वृषभ 

सुरुवातीस आपल्या व्यावसायिक जीवनात नवीन आव्हाने आल्याने आपली दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी आपणास अधिक परिश्रम करावे लागतील. शक्यतो दुसऱ्या दिवसाच्या दुपार पर्यंत कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नये. आठवड्याच्या अखेरीस कामाच्या ठिकाणी आपल्या कामगिरीत सुधारणा होईल. प्रत्येक साहस करण्यात प्रगतीच होईल. भागीदारी व संयुक्त कामांच्या बाबतीत घाईघाईत कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या सुरवातीस अभ्यासात अडचणी व विघ्न आल्याने आपणास नैराश्य येईल. आपण लक्ष केंद्रित करून दृढ मनोबलाने काम केल्यासच आपणास अपेक्षित परिणाम प्राप्त होण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात अभ्यासात आपण अधिक लक्ष घालू शकाल. संबंधाच्या बाबतीत सुरवात जरी चांगली नसली तरी दुसऱ्या दिवसाच्या दुपार पासून त्यात सुधारणा होऊ लागेल. आपण समाजात मिसळण्याची इच्छा व्यक्त कराल. आपल्या वैवाहिक जोडीदाराशी वार्तालाप करून आनंदित व्हाल. प्रणयी जीवनात आपली सक्रियता वाढली तरी आपल्या जोडीदारास थोडा अवधी द्यावा. आठवड्याच्या सुरवातीस व्यायाम व आहारातील पथ्य पाळून आरोग्य टिकवून ठेवू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात प्रतिकूल असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. असे असले तरी प्रकृतीत टप्प्या टप्प्याने सुधारणा होऊन उत्तरार्ध आपण आनंदात घालवू शकाल. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आप्तांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल.

मिथुन 

आठवड्याची सुरुवात आपण सकारात्मक ऊर्जा व वैचारिक नावीन्याने कराल. पहिल्या दिवशी आपला आत्मविश्वास वाढण्यास मदतरूप ठरेल असे काही लाभ होण्याची अपेक्षा सुद्धा आपण बाळगू शकता. असे असले तरी दुसऱ्या दिवसा पासून ग्रहस्थितीत होणाऱ्या बदलामुळे पूर्वार्धात व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात समतोल साधताना आपणास संघर्ष करावा लागेल. उत्तरार्धात कुटुंबीय व वैवाहिक जोडीदार ह्यांच्यासह सलोख्याच्या संबंधांचा आनंद लुटू शकाल. पूर्वार्धात काही अडचणी आल्या तरी प्रणयी जीवनात संबंधांचे सौख्य उपभोगू शकाल. आठवड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी आपली प्रकृती काहीशी नाजूक होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. ह्या दरम्यान शक्य असल्यास नियमितपणे योगासन व व्यायाम करण्याची संवय लावून घ्यावी. तसेच तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे, कि जेणे करून आपले आरोग्य उत्तम राहू शकेल. पूर्वार्धात विद्यार्थ्यांची चंचलता वाढली तरी उत्तरार्धात अभ्यासात त्यांचे लक्ष लागून अभ्यास चांगला होऊ शकेल.

कर्क

आठवड्याच्या सुरुवातीस आपण व्यावसायिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. आपण उत्साहित राहाल. वाणीचे प्रभुत्व असणाऱ्या क्षेत्रात आपली कामगिरी उत्तम होईल. पूर्वार्धात आपली थकबाकी मिळाल्याने आपली बँकेतील गंगाजळी वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. आठवड्याच्या मध्यास परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास शिकावे लागेल. एखाद दुसऱ्या समस्येमुळे आपली शांतता भंग होऊ शकेल. प्रसंगानुसार आपणास कंटाळा किंवा आळस येण्याची शक्यता सुद्धा आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादे साहस करण्यात यशस्वी झाल्याने आपण आनंदित व्हाल. उत्तरार्धात ग्रहस्थिती आपणास अनुकूल राहिल्याने कोणत्याही कामाचे नियोजन करून त्याची अंमल बजावणी ठामपणे करू शकाल. आता आपणास चिंतामुक्त होऊन आत्मविश्वासाने वाटचाल करता येईल. विद्यार्थ्यांसाठी पूर्वार्ध अनुकूल आहे, मात्र उत्तरार्धात चंचलता वाढल्याने अभ्यासाकडे थोडे दुर्लक्ष होईल. आठवड्याच्या अखेरच्या तीन दिवसात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.

सिंह 

आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपण कामाकडे अधिक लक्ष देऊ लागाल, ज्यात आपला दृष्टिकोन व बरेचसे विचार हे कारकिर्दी केंद्रित असतील. सध्या दूरवरच्या कार्याशी संबंधित असलेल्या व्यक्ती काही निर्णय जलदगतीने घेऊ शकतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांशी सलोखा निर्माण होऊन कारकिर्दीत प्रगती साधण्यासाठी त्यांचे पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन सुद्धा मिळेल. ह्या दरम्यान आपल्या चेहेऱ्यावरील तेज वाढेल व प्राप्तीत वाढ होत असताना स्वतःसाठी खर्च करण्याकडे सुद्धा आपण अधिक लक्ष देण्याची शक्यता आहे. ह्या खर्चात वस्त्रे, आभूषणे किंवा आपल्या गरजेच्या वस्तूंची खरेदी किंवा गुंतवणूक सुद्धा असू शकते. व्यावसायिक आघाडीवर गुंतवणूक करताना अति विचार करण्याच्या नादात हाती आलेली संधी निसटून जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या आठवड्यात स्पर्धेत आपण यशस्वी होऊ शकाल. उत्तरार्धात सार्वजनिक जीवनात आपली सक्रियता वाढेल. ह्या व्यतिरिक्त प्रणयी जीवनाचा नवीन अध्याय सुरु करू शकाल. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांसाठी आता अनुकूल दिवसांची सुरवात झाली आहे.

कन्या 

आठवड्याच्या सुरुवातीस आपणास बेचैनी जाणवेल. सुरवातीच्या दोन दिवसात खर्चात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे खर्च विचारपूर्वक करावा. वैचारिक वादळांवर नियंत्रण ठेवावे. पूर्वार्धात गूढ व आध्यात्मिक गोष्टींच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास मित्र, स्नेहीजन ह्यांच्यासह बाहेर फिरावयास जाण्याचे, सुंदर वस्त्रालंकार परिधान करण्याचे प्रसंग उदभवतील. आपल्या वाक्चातुर्याने कामात यशस्वी होऊ शकाल. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. आपल्या प्रियव्यक्तीसह जवळपासच्या रमणीय स्थळी फिरावयास जाण्याची शक्यता सुद्धा आहे. आपण सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. व्यावसायिक आघाडीवर आपल्या कामाची प्रशंसा करण्यात येईल. आजवर केलेल्या कामाचे फळ म्हणून धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. ह्या आठवड्यात आयात - निर्यातीशी संबंधित व्यापाऱ्यांना लाभ व यश प्राप्ती होईल. नवीन कामाची सुरवात काळजीपूर्वक करावी. अधीरता व आक्रमक वृत्ती किंवा अंधानुकरण आपल्या मनास सतत नकारात्मकतेकडे खेचून घेईल.

तूळ 

आठवड्याच्या सुरुवातीस स्त्री मित्रांमुळे फायदा होईल. आपल्या प्रियव्यक्तीचे सानिध्य लाभल्याने आपण आनंदित व्हाल. असे असले तरी आपला जोडीदार संबंधांच्या बाबतीत उतावीळ होईल किंवा आवेशात येईल त्यामुळे आपणास विनम्र राहावे लागेल. संततीसाठी खर्च किंवा गुंतवणूक करू शकाल. वैचारिक विपुलता व वाणीतील माधुर्य ह्यामुळे इतरांना प्रभावित करू शकाल. ह्या व्यतिरिक्त लोकांशी असलेल्या संबंधात सलोखा निर्माण करू शकाल. आठवड्याच्या मध्यास आपल्यात थोडी विव्हळता असल्याचे दिसून येईल. विशेषतः शारीरिक शैथिल्यामुळे कामात किंवा संबंधात मन रमणार नाही. शासना कडून मिळणाऱ्या लाभात खोळंबा होण्याची किंवा कायदेशीर बाबीत खर्च वाढण्याची शक्यता आहे. सध्या कायद्याच्या विरोधात कोणतेही कार्य करू नये. उत्तरार्धात ग्रहस्थिती आपणास अनुकूल होईल. आपणास नशिबाची साथ मिळू शकेल. आर्थिक अनिश्चितता असून सुद्धा प्राप्ती व खर्चाचा समतोल साधण्यात आपण यशस्वी व्हाल. आपण प्रवचन, बैठक किंवा चर्चेत यशस्वी होऊ शकाल. व्यवसायात आपण नवीन विचारसरणी आत्मसात कराल किंवा नवीन सुरवात कराल. विद्यार्थ्यांना पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध जास्त अनुकूल आहे.

वृश्चिक 

आठवड्याच्या सुरुवातीस नियमितपणे व्यायाम व योगासन करण्यावर लक्ष केंद्रित केल्यास दिलासा मिळू शकेल. संभाव्य अरिष्टे टाळण्यासाठी संयमशील व विचारपूर्ण वर्तन असणे आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक आघाडीवर लाभ होण्याचे संकेत आहेत. भिन्नलिंगी मित्रांकडून लाभ सुद्धा होईल तसेच त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार निवडण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. विदेशाशी व्यापार करणाऱ्यांना किंवा विदेशी संस्थेत नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त प्राप्ती होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास आपल्या वाणी व वर्तनाने कोणाचा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यावी. निषेधात्मक कार्यापासून दूर न राहिल्यास अडचणीत येऊ शकता. आपली मानसिकता सकारात्मक ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मन असंतोषाने ग्रासले जाईल. उत्तरार्धात भिन्नलिंगी व्यक्तीप्रती आकर्षित व्हाल. व्यावसायिक आघाडीवर प्रगतीसाठी आपण सक्रिय व्हाल व आपल्या यशामुळे सन्मानित व्हाल. दूरवरच्या कार्यात आपण उत्तम प्रगती साधू शकाल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत उत्तरार्धात सुधारणा होईल. गूढ व आध्यात्मिक बाबतीत नवीन काही शिकण्याची संधी मिळू शकते.

धनु 

व्यावसायिक आघाडीवर सध्या शासन किंवा त्यांच्याशी संबंधित कार्यातून लाभ व यश प्राप्ती होईल. दूरवर रहात असलेल्या संतती कडून चांगली बातमी मिळेल किंवा त्याची भेट होईल. आपणास धार्मिक यात्रा किंवा प्रवास घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरवातीपासूनच आपण कामात अति व्यस्त राहाल. नोकरीत आपणास सहकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकेल. असे असले तरी काही अप्रिय घटनांमुळे आपले मानसिक स्वास्थ्य दुर्बल होईल, परंतु आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेने व आत्मविश्वासाने मार्गक्रमण केल्यास परिस्थिती आपणास अनुकूल होण्यास वेळ लागणार नाही. दीर्घकालीन विचार केल्यास आपण आपली कार्ये पूर्ण करून किंवा महत्वाचे प्रकल्प हाती घेऊन इतरांना आश्चर्यचकित करू शकाल. आपले कठोर परिश्रम व शिकण्याची वृत्ती प्रशंसेस पात्र आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील. विद्यार्थ्यांना ज्ञाना सह व्यावहारिक ज्ञान सुद्धा मिळू शकेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी बोलताना वाणी संयमित ठेवावी. अति आक्रमकपणे किंवा जोराने बोलण्याच्या किंवा आरडा ओरडा करण्याच्या संवयीवर आळा घालावा. ह्या आठवडयात प्रकृतीत सतत चढ - उतार येण्याच्या शक्यतेमुळे आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर 

आठवड्याच्या सुरुवातीस कुटुंबियांशी सौम्यतेने वागावे. शक्यतो आपलेच म्हणणे खरे ठरविण्याचा प्रयत्न करू नये. जमीन, घर व वाहन इत्यांदींचे दस्तावेज करताना गाफील राहू नये. आपल्या व्यापार - व्यवसायात लाभ होऊन प्राप्तीत वृद्धी होईल. नोकरी - व्यवसायाच्या क्षेत्रात आनंददायी व लाभदायी बातमी मिळेल. कामात काही नवीन करावयाचे असले तर त्यात आपण मागे पडू शकाल. विशेषतः नवीन विचार, सर्जनात्मकता इत्यादी बाबतीत आपली बुद्धी काम करणार नाही. शेअर्स बाजारा पासून दूर न राहिल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. विवाहितांना सासुरवाडी कडून लाभ होण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात नोकरीत किंवा व्यवसायात उच्च पद प्राप्त होऊन प्राप्तीत वाढ होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी पूर्वार्ध अनुकूल आहे. उत्तरार्धात ऋतुजन्य विकारांचा त्रास संभवतो. ह्या दरम्यान वैवाहिक जोडीदार किंवा प्रियव्यक्तीच्या आरोग्याची थोडी काळजी वाटेल.

कुंभ

आठवड्यात कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. माते कडून विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. संततीशी सलोखा राहील. ह्यामुळे आपल्या व्यावसायिक कामात सुद्धा सकारात्मक प्रभाव असल्याचे दिसून येईल. आपण एकाग्रचित्ताने कामे कराल तसेच नवीन काही करण्यास तत्पर राहाल. आपला आत्मविश्वास वाढल्याने प्रत्येक कार्य उत्तम रित्या करू शकाल. व्यापारात व प्राप्तीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा अन्य प्रकारे प्रोत्साहन व प्राप्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत. दैनंदिन कार्यातून विश्रांती घेण्यासाठी प्रियव्यक्तीसह सहलीचे आयोजन करून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नलिंगी व्यक्तीचे सामीप्य आपणास आनंदित करेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विशेषतः एखाद्या विषयाचा खोलात शिरून अभ्यास करताना आपली आकलनशक्ती कमी असल्याचे जाणवेल. आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहिले तरी रक्तदाब, पाठदुखी व नेत्र विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.

मीन 

आठवड्याच्या सुरुवातीस आपली कामे सुरळीत पार पडावीत म्हणून कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधताना किंवा चर्चा करताना अति उतावीळ किंवा कठोर होऊ नये. जमीन, घर, वाहन इत्यादी संबंधित सौदे काळजीपूर्वक करावेत. आर्थिक लाभ झाल्याने निधी विषयक ताण दूर होईल. मात्र, नशिबाच्या भरंवशावर राहू नये. व्यावसायिक आघाडीवर प्रतिस्पर्धी व विरोधकांवर मात करू शकाल. कार्यालयात सहकाऱ्यांचे व कनिष्ठांचे संपूर्ण सहकार्य मिळू शकेल. आपल्या विचारातील नावीन्यता व सर्जनात्मक कार्यशैलीमुळे नोकरीत आपली कामगिरी उत्तम होऊ शकेल. संबंधांसाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. असे असले तरी जे आधी पासूनच प्रणयी संबंधात आहेत त्यांना कदाचित आपल्या जोडीदाराच्या अहंकारास सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी सुद्धा भिन्नलिंगी सहकाऱ्यांच्या सानिध्यात अधिक वेळ घालवावा लागेल. सध्या मित्रांकडून अधिक अपेक्षा करू नये. अशा परिस्थितीत आपली वृत्ती समाधानी असावी. शैक्षणिक क्षेत्रात रुची राहील. सर्वकाही आपल्या योजनेनुसार निर्धारित वेळेत अपेक्षेनुसार पार पडल्याने आपणास मानसिक दिलासा मिळेल. बहुतांशी आपले आरोग्य उत्तम राहील.

 

Web Title: weekly horoscope 4 october to 10 october 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.