आठवड्याचे राशीभविष्य - 14 जुलै ते 20 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 09:04 AM2019-07-15T09:04:43+5:302019-07-15T09:09:48+5:30

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

weekly horoscope 14 july to 20 july 2019 | आठवड्याचे राशीभविष्य - 14 जुलै ते 20 जुलै 2019

आठवड्याचे राशीभविष्य - 14 जुलै ते 20 जुलै 2019

Next

मेष

 

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. ह्या दरम्यान एखादा संपत्ती विषयक वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. सरकारी कामे सुद्धा आपणास सावधपणे करावी लागतील. मात्र आठवड्यात आपण आपले उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न कराल. एकाच वेळी अनेक कामे हाती न घेण्याचा व आजचे काम उद्यावर न ढकलण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आपण अतिरिक्त कष्ट करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल. आठवड्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे... आणखी वाचा

वृषभ

आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपण आपले नांव व प्रतिष्ठा इत्यादींसाठी खूप कष्ट कराल. मात्र, दुसऱ्यांवर आपले ज्ञान लादण्याचा प्रयत्न करू नका. लोक आपल्या कामाची प्रशंसा करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा उत्तम आहे. व्यापारीवर्गास काही विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सुद्धा काही लाभ होणे अपेक्षित आहे. आपण व्यापारवृद्धीसाठी प्रयत्न करू शकता. आठवड्यात आपण हौस - मौज करण्यासाठी खर्च करू शकाल... आणखी वाचा

मिथुन

आठवड्याच्या प्रथम पर्वापेक्षा दुसरे पर्व आपल्यासाठी अधिक चांगले असेल. एखाद्या गोष्टीत घाई केल्याने आपले नुकसान होऊ शकेल. मात्र, आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात आपणास कामात यशप्राप्ती होईल. नोकरी करणार्यांना एखाद्या बैठकीसाठी बाहेर जावे लागू शकते. आपण नोकरी बदलण्याचा सुद्धा विचार करू शकता. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा उत्तम आहे. आपण निष्ठेने काम करताना सुद्धा जुनी कामे पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्याल... आणखी वाचा

कर्क 

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी असला तरी बऱ्याच बाबतीत उत्तम असल्याचे दिसत आहे. ह्या आठवड्यात आपली बरीचशी प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. नोकरीत विशेष आर्थिक लाभ होईल. ह्या आठवड्यात आपला शेअर्स बाजाराकडे कल होईल. आपण एखाद्या दीर्घ कालीन प्रकल्पात सुद्धा गुंतवणूक करू शका. आठवड्यात कोणत्याही नवीन कामाची सुरुवात विचारपूर्वक करण्याची गरज आहे... आणखी वाचा

सिंह

आठवडा व्यावसायिक दृष्ट्या व्यस्ततेचा आहे. व्यापारवृद्धीसाठी आपणास विशेष प्रयत्न करावे लागतील. भागीदारी व्यवसायात आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकणार नाही. ह्या आठवड्यात आपणास नकारात्मक विचारांपासून दूर राहावे लागेल. आपण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. कोणाला उधारीवर पैसे देणे नुकसानदायी ठरू शकेल. ह्या आठवड्यात गुप्त शत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील... आणखी वाचा 

कन्या

कार्यस्थळी आपल्या प्रशासकीय क्षमतेची प्रशंसा होईल. व्यापार - व्यवसायात वाढ करण्याचा आपण प्रयत्न करू शकाल. व्यापारात व नोकरीत जोखमीची कामे सावधपणे करणे हितावह राहील. विरोधक व वरिष्ठ यांच्याशी वाद न घालण्याचा सल्ला आपणास देता येणार नाही. एखाद्या व्यावसायिक बैठकीसाठी केलेला प्रवास लाभदायी ठरेल. ह्या आठवड्यात खर्चावर नियंत्रण राहणार नाही. पिता किंवा भावंडांकडून प्रत्यक्षात आर्थिक लाभ होऊ शकेल... आणखी वाचा

तूळ

आठवड्याची सुरुवात जरी चांगली झाली तरी दुसऱ्या पर्वात थोडा त्रास होऊ शकेल. ह्या आठवड्यात नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आपल्यासाठी हितावह राहील. मात्र, व्यापार - व्यवसाय प्रगती पथावर नेण्यासाठीची आपली रणनीती यशस्वी होणार नाही. अचानकपणे उदभवणाऱ्या खर्चासाठी आपली तयारी असावयास हवी. प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात एखादा त्रास होऊ शकतो.आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासावर विशेष लक्ष द्यावे लागेल... आणखी वाचा

वृश्चिक 

आठवड्याची सुरुवात चांगली होईल. साहित्य व संगीत यातील आपली गोडी वाढू शकते. आठवड्यात एखाद्या ठिकाणाहून एखादी चांगली बातमी ऐकण्यात येऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकारी आपल्या व्यवहाराने खुश होतील. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. व्यापार - व्यवसायात उन्नती होईल. आठवड्यात एखादा आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो. कार्यात यश मिळेल. आर्थिक दृष्ट्या हा आठवडा उत्तम आहे... आणखी वाचा

धनु 

आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. द्विधा मनःस्थितीमुळे आपण कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. आळशीपणामुळे कार्यालयात वरिष्ठ सुद्धा आपल्यावर नाराज होतील. मात्र, आठवड्याच्या दुसऱ्या पर्वात आपणास यश प्राप्ती होऊ शकेल. आनंद प्राप्त होईल. व्यापार - व्यवसायात यश प्राप्ती होईल. विरोधकांवर मात करू शकाल. कायदेशीर बाबींपासून दूर राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागू शकेल... आणखी वाचा

मकर 

आठवडा आपणास मिश्र फलदायी आहे. व्यापार वृद्धी झाल्याने पैशांचा ओघ सुरू होईल. कामाच्या बाबतीत धावपळ वाढेल. आठवड्याच्या मध्यास चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. विरोधकांशी वाद होतील. गुप्त शत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. वादा पासून दूर न राहिल्यास व्यावसायिक भागीदारीत आपले नुकसान होऊ शकते. मात्र, आठवडा अखेरीस वसुली होऊ शकेल. हा आठवडा प्राप्तीच्या दृष्टीने उत्तम आहे... आणखी वाचा

कुंभ 

आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. मात्र, आठवड्याचा बहुतांश वेळ आर्थिक लाभा विषयी विचार करण्यातच आपण घालवाल. आर्थिक लाभासाठी आपण विविध मार्गाच्या शोधात राहाल. शेअर्स बाजारात सुद्धा आपण प्रयत्न कराल, मात्र आपणास कोठेही गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आठवड्याच्या मध्यास आपण नवीन उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी होऊ शकाल. दरम्यान जोखमीच्या कामात सुद्धा आपण प्रयत्न कराल... आणखी वाचा

मीन 

आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. ह्या आठवड्यात आपण भावनात्मक दृष्ट्या सबळ राहाल. ह्या दरम्यान इतरांचे दोष पाहण्या ऐवजी स्वतःचे दोष सुधारण्याकडे आपण लक्ष द्यावे. घाईघाईत केलेल्या कामामुळे आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या एखाद्या हितचिंतकाच्या सल्ल्यामुळे आपला खूप मोठा फायदा होऊ शकेल. सरकारी कामात काळजी घ्यावी लागेल. आपणास स्वतःवर विश्वास ठेवून कामे करावी लागतील. स्वतःसाठी सकारात्मक वातावरण निर्मिती करावी... आणखी वाचा

 

Web Title: weekly horoscope 14 july to 20 july 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.