आजचे राशीभविष्य 21 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 07:35 AM2019-07-21T07:35:19+5:302019-07-21T07:36:01+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's zodiac sign 21 July 2019 | आजचे राशीभविष्य 21 जुलै 2019

आजचे राशीभविष्य 21 जुलै 2019

Next


मेष -  आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात आणि मित्रांसोबत घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल.  आणखी वाचा 

वृषभ - नोकरीत पदोन्नतीची आनंदी वार्ता मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. आणखी वाचा  

मिथुन -  आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. नोकरी धंद्यात सहकारी आणि उच्च अधिकारी यांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिकदृष्ट्या निराश व्हाल.  आणखी वाचा  

कर्क -  आज तुमच्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. तब्बेतीच्या तक्रारी राहतील.  आणखी वाचा  

सिंह -  आजचा दिवस आपण मनोरंजन आणि हिंडण्या- फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीन असेल.  आणखी वाचा 

कन्या - कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील आणि स्वास्थ्य पण चांगले राहील. आणखी वाचा 

तूळ - आज आपण आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा यांत भाग घेणे तुम्हाला आवडेल.  आणखी वाचा 

वृश्चिक - आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल. शारीरिक स्वास्थ्य बघडेल आणि मानसिक दृष्ट्या बेचैन राहाल. आणखी वाचा 

धनु -  आज आपणावर गूढ रहस्यवाद आणि अध्यात्म रंग चढेल. म्हणून त्या विषयात खोलवर उतरण्याचा प्रयत्न कराल. आणखी वाचा 

मकर -  मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. घरातील व्यक्तींशी मतभेद न होण्याच्यादृष्टीने ही गोष्ट आवश्यक आहे. आणखी वाचा  

कुंभ -  शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्व दृष्टीनी आजचा दिवस आपणासाठी चांगला ठरेल. कुटुंबीयां समवेत रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा  

मीन - कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा आणि पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या,  चित्ताची एकाग्रता कमी राहील. आणखी वाचा 

Web Title: Today's zodiac sign 21 July 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.