आजचे राशीभविष्य - 10 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 07:24 AM2019-09-10T07:24:34+5:302019-09-10T07:24:53+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - September 10, 2019 | आजचे राशीभविष्य - 10 सप्टेंबर 2019

आजचे राशीभविष्य - 10 सप्टेंबर 2019

Next

मेष - श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबीयां समवेत घरगुती बाबींचा महत्त्वपूर्ण विचार- विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश सांगतात की विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्याकडून बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा

मिथुन - कोणत्याही प्रकारच्या आपत्तीपासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. शस्त्रकियेसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. आणखी वाचा

कर्क- श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस तुम्ही मौज- मजा आणि मनोरंजन यात गढून जाल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत करमणूक केन्द्र किंवा पर्यटनस्थळी जाण्याची संधी मिळेल. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेशांच्या मते आज घरात हर्ष आणि आनंदाचे वातावरण राहील. घरातील व्यक्तींबरोबर आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

कन्या - आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचनासारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. आणखी वाचा

तूळ - गणेशजी सांगतात की अतिशय संवेदनशीलता आणि विचारांचे अवडंबर यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता आणि स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेश कृपेने आजचा दिवस खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय आणि मित्रांशी सुसंवाद साधाल. आणखी वाचा

धनु - आपला आजचा दिवस मध्यम फलदायी सिद्ध होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस ईश्वर नाम- स्मरणात जाईल. धार्मिक कार्यात मग्न राहाल. नोकरी व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. आणखी वाचा

कुंभ - आज कोणाकडून रक्कम स्वीकारणे किंवा पैशाच्या देवाण- घेवाणीचे व्यवहार करू नका असे श्रीगणेश सुचवितात. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

मीन - सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र- स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. आणखी वाचा

 

Web Title: Today's horoscope - September 10, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.