आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२०, धनलाभाचे योग, नोकरीत वरिष्ठांपासून राहा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 07:19 AM2020-07-30T07:19:53+5:302020-07-30T07:20:24+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Today's horoscope - July 30, 2020 | आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२०, धनलाभाचे योग, नोकरीत वरिष्ठांपासून राहा सावध

आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२०, धनलाभाचे योग, नोकरीत वरिष्ठांपासून राहा सावध

Next

मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवून अध्यात्माकडे वळाल. गूढ रहस्यमय विद्ये कडे आकर्षण राहील. गाढ चिंतन- मनन आपणाला अलौकिक अनुभूती देईल. आणखी वाचा 

वृषभ -  श्रीगणेशाच्या आशीर्वादाने संसारात आणि दांपत्य जीवनात सुख- शांती अनुभवाल. परिवारातील सदस्य आणि निकटचे मित्र यांच्या समवेत उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. धनलाभ होईल.  आणखी वाचा 

मिथुन - श्रीगणेश कृपेने आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. तब्बेत चांगली राहील. आणखी वाचा 

कर्क - दिवसाची सुरूवात चिंता आणि उद्वेगाने होईल. तब्बेतीच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही. अचानक धन खर्च होईल. आणखी वाचा 

सिंह - नकारात्मक विचार निराशा निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आईवडिलांशी मतभेद होतील. त्यांची तब्बेत बिघडेल. आणखी वाचा 

कन्या - अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा असे श्रीगणेश सांगतात. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे आणि शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आणखी वाचा 

तूळ - आपला हट्टीपणा सोडून समाधानकारक काम करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. आणखी वाचा 

वृश्चिक - तन- मनाने खुश आणि ताजेतवाने राहाल. कुटुंबीय आणि मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, भेट- मुलाखात होईल. जीवन साथीदारा बरोबर गाढ आपलेपणा निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल.  आणखी वाचा 

धनु - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणासाठी कष्टदायक राहील. तब्बेत बिघडेल. परिवारातील व्यक्तींसोबत कटकट झाल्याने मन दुःखी होईल. त्यांमुळे मानसिक दृष्ट्या पण अस्वस्थ राहाल. आणखी वाचा 

मकर - नोकरी- व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत आजचा दिवस आपणाला शुभ जाईल असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि आप्तेष्टांसह बाहर जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल.  आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश कृपेने आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण होईल. त्यामुळे आपण खुश राहाल. नोकरी- व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. आणखी वाचा 

मीन - नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. तब्बेतीची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी काम करताना सावध राहा.  आणखी वाचा 

Web Title: Today's horoscope - July 30, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.