आजचे राशीभविष्य, सोमवार, 9 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 07:01 AM2020-03-09T07:01:01+5:302020-03-09T07:02:34+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays Horoscope 9th march 2020 kkg | आजचे राशीभविष्य, सोमवार, 9 मार्च 2020

आजचे राशीभविष्य, सोमवार, 9 मार्च 2020

Next

मेष - आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक आणि मानसिक शैथिल्य जाणवेल. अधिक कष्ट करूनही अल्प यश मिळेल. संततीची काळजी सतावेल.  आणखी वाचा 

वृषभ - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज कामासाठी खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास लाभेल. अपेक्षेप्रमाणे कामात यश मिळेल. माहेरहून लाभदायक वार्ता येतील. आणखी वाचा 

मिथुन - नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने आज शुभ दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. सरकारकडून लाभ होण्याची शक्यता. व्यवसाय धंद्यात वरिष्ठ अधिकार्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. आणखी वाचा 

कर्क - आज नकारात्मक दृष्टिकोनातून व्यवहार करू नका असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. आणखी वाचा  

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपणात आत्मविश्वासाचे प्रमाण जास्त असेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घ्याल. वडील आणि वडील धार्‍यांकडून लाभ होईल. आणखी वाचा 

कन्या - आपल्या अहंपणाला झटका लागणार नाही अथवा कोणाशी भांडणतंटा होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता राहील. आणखी वाचा  

तूळ - आज आपणासाठी शुभ फलदायी दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. विविध क्षेत्रांतून लाभ मिळतील आणि आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. आणखी वाचा  

वृश्चिक - आजचा दिवस शुभ फलदायी जाण्याचे संकेत श्रीगणेश देतात. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकारी खुश राहतील.  आणखी वाचा 

धनु - आज तब्येत यथा तथा राहील. शारीरिक दृष्ट्या आळस आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता आणि व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. आणखी वाचा  

मकर - अचानक धनखर्चाचे योग आहेत. त्यामुळे व्यावहारिक तथा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोधापासून सांभाळा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करा. आणखी वाचा  

कुंभ - आज खंबीर मन आणि दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक काम कराल. प्रवास- सहलीची शक्यता. आणखी वाचा  

मीन -  श्रीगणेश आज आपणाला शुभफलदायी दिवस सांगतात. मनोबल आणि आत्मविश्वास चांगला राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल.आणखी वाचा 

Web Title: Todays Horoscope 9th march 2020 kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.