आजचे राशीभविष्य - 25 जून 2020; कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सुखाचा अन् आनंदाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 07:17 AM2020-06-25T07:17:02+5:302020-06-25T07:19:20+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Todays horoscope 25 June 2020 | आजचे राशीभविष्य - 25 जून 2020; कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सुखाचा अन् आनंदाचा

आजचे राशीभविष्य - 25 जून 2020; कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सुखाचा अन् आनंदाचा

Next

मेष - आज प्रत्येक पाऊल जपून उचलण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. भोवतालच्या स्वकीयांबरोबर उग्र चर्चा होणार नाही यावर लक्ष द्या. शारीरिक व मानसिक दृष्ट्या ग्रस्त राहाल. आणखी वाचा.

वृषभ - श्रीगणेश सांगतात की आज भावनेच्या बंधनात गुंतण्याचा अनुभव घ्याल. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. आणखी वाचा.

मिथुन - नकारात्मक मानसिक व्यवहाराला पायबंद घाला असे श्रीगणेश सांगत आहेत. असंतोषाची भावना मनात वाढेल. कौटुंबिक वातावरणात ताळमेळ राहणार नाही. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. आणखी वाचा.

कर्क - भावनेच्या भरात वाहून जाऊ नका अशी सूचना श्रीगणेश देत आहेत. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. आणखी वाचा.

सिंह - कोणताही अंतिम निर्णय घेण्याच्या स्थितीत आपण असणार नाही. म्हणून महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नये असे श्रीगणेश सुचवितात. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. वाणीवर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा.

कन्या - आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांती लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा.

तूळ - आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल, असे श्रीगणेश सांगतात. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. आणखी वाचा.

वृश्चिक - आज भाग्योदयाचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या वार्ता येतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. धार्मिक हेतूने प्रवासाची शक्यता. धनलाभाची पण शक्यता. आणखी वाचा.

धनु - आज सकाळच्या वेळी शरीर प्रकृती ठीक नसेल असे श्रीगणेश सांगतात. निषेधार्ह विचार मनःस्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम साधतील. सबब वैचारिक स्तरावर संयम राखणे आवश्यक. आणखी वाचा.

मकर - आज कुटुंबीयांबरोबर आनंदपूर्वक प्रवासाचा अनुभव घ्याल. दुपारनंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. सरकारी कामात अडथळे येतील. आणखी वाचा.

कुंभ - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस सुखाचा आणि शांततेचा जाईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा.

मीन - आज विजातीय आकर्षणापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कोणाशीही बौद्धिक चर्चा अथवा वादविवाद करू नका. नवीन कार्य हाती घेऊ नका. दुपारनंतर स्थिती एकदम पालटेल. आणखी वाचा.

Web Title: Todays horoscope 25 June 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.