आजचे राशीभविष्य - 24 जून 2020; मिथुन राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजनात अडचणी येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 07:17 AM2020-06-24T07:17:04+5:302020-06-24T07:17:33+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Todays horoscope 24 June 2020 | आजचे राशीभविष्य - 24 जून 2020; मिथुन राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजनात अडचणी येणार

आजचे राशीभविष्य - 24 जून 2020; मिथुन राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजनात अडचणी येणार

Next

मेष - श्रीगणेश सांगतात की मानसिक व्यग्रतेत आजचा दिवस जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. आणखी वाचा.

वृषभ - श्रीगणेश कृपेने आज शरीराने आणि मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. आणखी वाचा.

मिथुन - श्रीगणेश सांगतात की काम होण्यास वेळ लागेल पण प्रयत्न चालू ठेवा. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक नियोजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. आणखी वाचा.

कर्क - मित्र आणि स्नेही यांच्याबरोबर आजचा दिवस तुम्ही उल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. प्रवास व सहली यांची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घ्याल. आणखी वाचा.

सिंह - श्रीगणेश सांगतात की खूप भावविवश बनल्याने मन गुंतुन राहील. स्त्री वर्गापासून आज सांभाळून राहा. दलाली चर्चा वाद यापासून सांभाळून राहाल. आणखी वाचा.

कन्या - आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल असे श्रीगणेश सांगतात. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात स्त्रीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. मित्राबरोबर एखाद्या रम्य- मनोहर स्थळी जाल. आणखी वाचा.

तूळ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. नोकरी व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरीष्ठासोबत महत्त्वपूर्ण चर्चा कराल. पदोन्नती होऊ शकते. आणखी वाचा.

वृश्चिक - श्रीगणेश सुचवितात की, नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी जपूनच काम करा. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीबरोबर मतभेद. आणखी वाचा.

धनु - आज नवीन कामाची सुरूवात न करण्याचे श्रीगणेश सुचवतात. आजारावरील उपचारही प्रारंभ करू नका. वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवा. अधिक संवेदनशीलतेमुळे मन व्यथित बनेल. आणखी वाचा.

मकर - श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस आपल्याला शुभ आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. आणखी वाचा.

कुंभ - श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल कुटुंबियांसमवेत दिवस चांगला जाईल. नोकरी धंद्यात सहकार्‍यांचे सहकार्य चांगले मिळेल. आणखी वाचा.

मीन - श्रीगणेश सांगतात की आज आपली सृजनशक्ती अधिकच चमकेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्यविश्वाची सफर कराल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ. आणखी वाचा.

Web Title: Todays horoscope 24 June 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.