आजचं राशीभविष्य- 13 जून 2021; विरोधकांवर कराल मात; अपूर्ण कामं मार्गी लागतील हमखास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 07:18 AM2021-06-13T07:18:25+5:302021-06-13T07:18:54+5:30

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस; काय सांगते तुमची रास

Todays horoscope 13 June 2021 | आजचं राशीभविष्य- 13 जून 2021; विरोधकांवर कराल मात; अपूर्ण कामं मार्गी लागतील हमखास

आजचं राशीभविष्य- 13 जून 2021; विरोधकांवर कराल मात; अपूर्ण कामं मार्गी लागतील हमखास

Next

मेष - आज आपले मन वैचारिक स्तरावर मानसिक ताण अनुभवेल असे गणेशजी सांगतात. अधीक संवेदनशीलतेमुळे मन हळवे बनेल. इतरांशी वाद-विवाद टाळा. आप्तेष्टांचे मन दुखावेल. आणखी वाचा

वृषभ - प्रारंभी काही अडचणी आल्या तरी आर्थिक नियोजन पूर्ण होईल असे गणेशजी सांगतात. मित्र व हितचिंतकांच्या भेटीने आनंद होईल. व्यवसायात सहकार्य लाभेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेशज सांगतात की आपला दिनारंभ शारीरिक व मानसिक स्वास्थ्याने होईल. आप्तेष्टांसमवेत वेळ आनंदात जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभ होईल. दुपारनंतर आर्थिक नियोजन बिनसले आहे असे वाटेल व नंतर पूर्ण होत आहे असे वाटेल. आणखी वाचा

कर्क - आज उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. डोळ्यांचा त्रास संभवतो. मानसिक चिंता पण असेल. बोलण्या- वागण्या कडे लक्ष द्या. अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या. दुपारनंतर समस्या कमी होतील. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा

सिंह - आज आपल्या मनातील आवेश आणि राग यांमुजे इतरांशी जपून व्यवहार करा. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टिने खराबच. मनात काळजी राहील. घरातील लोकांशी कठोरतेने वागाल. आणखी वाचा

कन्या - आज सकाळचा प्रहर आपणाला आनंददायी आणि लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. येणी वसूल होतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. दुपारनंतर परिस्थिती प्रतिकूल बनेल. आनंदी मन अस्वस्थ राहील. आणखी वाचा

तूळ - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी- व्यवसायात उत्साहाने काम कराल. पदोन्नती मिळेल. शासकीय कामे सहज पार पडतील. सामाजिक दृष्टिकोनातून आपली प्रतिष्ठा वाढेल. धनप्राप्तीसाठी अनुकूल काळ. आणखी वाचा

वृश्चिक - गणेशजींचे आपणांस सांगणे आहे की विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी वादविवाद करू नका. नोकरी- व्यवसायात प्रतिकूल परिस्थिती. संततीबरोबर मतभेदाची शक्यता. दुपारनंतर घर, नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी सर्वांचा दृष्टिकोन नकारात्मक राहील. आणखी वाचा

धनु - गणेशजी आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. संतापामुळे हानी होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. नोकरी व्यवसायात सहकार्यान्ची भूमिका नकारात्मक राहील. आणखी वाचा

मकर - आज प्रिय व्यक्ति बरोबर फिरणे आणि खाण्यापिण्याचा अनुभव ध्याल. वाहन सुख तसेच मानससम्मान मिळेल. परंतु दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. रागाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

कुंभ - आज आपणांस कार्य सफलता आणि यश-कीर्ति मिळेल असे गणेशजी सांगतात. तन- मन स्वस्थ राहील. सामाजिक मान- सम्मान वाढेल. दुपारनंतर मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेशजी सांगतात की आजचा आपला दिवस खूप चांगला जाईल. मित्र भेटीने आनंद होईल. विद्यार्थ्यान्साठी दिवस चांगला आहे. विरोधकांवर मात कराल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आणखी वाचा

Web Title: Todays horoscope 13 June 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.