आजचे राशीभविष्य - 08 मे 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 07:15 AM2020-05-08T07:15:33+5:302020-05-08T07:21:17+5:30

जाणून घ्या, कसा जाईल तुमचा आजचा दिवस

Today's horoscope - 08 May 2020 vrd | आजचे राशीभविष्य - 08 मे 2020

आजचे राशीभविष्य - 08 मे 2020

Next

मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवून अध्यात्माकडे वळाल. गूढ रहस्यमय विद्ये कडे आकर्षण राहील. आणखी वाचा

वृषभ  - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने संसारात आणि दांपत्य जीवनात सुख- शांती अनुभवाल. परिवारातील सदस्य आणि निकटचे मित्र यांच्या समवेत उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश कृपेने आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. आणखी वाचा

कर्क - दिवसाची सुरूवात चिंता आणि उद्वेगाने होईल. तब्बेतीच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला नाही. आणखी वाचा

सिंह - नकारात्मक विचार निराशा निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आणखी वाचा

कन्या- अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा असे श्रीगणेश सांगतात. कामात यश तर मिळणारच आहे. आणखी वाचा

तूळ- आपला हट्टीपणा सोडून समाधानकारक काम करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. आणखी वाचा

वृश्चिक- तन- मनाने खुश आणि ताजेतवाने राहाल. कुटुंबीय आणि मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, भेट- मुलाखात होईल.  आणखी वाचा

धनु- श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणासाठी कष्टदायक राहील. तब्बेत बिघडेल. परिवारातील व्यक्तींसोबत कटकट झाल्याने मन दुःखी होईल. आणखी वाचा

मकर - नोकरी- व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत आजचा दिवस आपणाला शुभ जाईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश कृपेने आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण होईल. त्यामुळे आपण खुश राहाल. नोकरी- व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. आणखी वाचा

मीन - नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 08 May 2020 vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.