आजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२१: मीन राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजन करण्यास शुभ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 07:07 AM2021-09-25T07:07:08+5:302021-09-25T07:07:57+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

todays daily horoscope september 25 2021 know what your rashi says rashibhavishya | आजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२१: मीन राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजन करण्यास शुभ दिवस

आजचे राशीभविष्य - २५ सप्टेंबर २०२१: मीन राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजन करण्यास शुभ दिवस

Next

मेष - स्फूर्ती आणि उत्साहपूर्ण दिवसाची सुरूवात कराल. घरात मित्र आणि सगेसोयरे यांच्या येण्याजाण्याने आनंदाचे वातावरण राहील. त्यांची अचानक भेट तुम्हाला खूश करेल. श्रीगणेशजी म्हणतात की आज आर्थिक फायदा मिळण्याची ही शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवा. अधिक वाचा

वृषभ - आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय सांभाळून घ्या. कोणाबरोबर गैरसमज होण्याची शक्यता श्रीगणेशांना दिसते आहे. तब्येत खराब असल्यामुळे मन उदास बनेल. परिवारात स्नेह्यांचा विरोध मतभेद निर्माण करेल ज्यामुळे मन दुःखी होईल. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे नाराज व्हाल. अधिक वाचा

मिथुन - सामाजिक, आर्थिक तसेच पारिवारिक क्षेत्रात लाभ होण्याचे संकेत श्रीगणेश देतात. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. मित्रांकडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. एखाद्या सुंदर जागी पर्यटनासाठी गेल्याने संपूर्ण दिवस आनंद आणि उल्हासपूर्ण बनेल. जीवनसाथीच्या शोधात असाल तर त्यासाठी अनुकूल दिवस आहे. अधिक वाचा

कर्क - नोकरी व्यवसायात उच्च पदस्थांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती याची बातमी म्हणजे आश्चर्य वाटायला नको. आई तसेच कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर खूप जवळीक राहील. मानप्रतिष्ठा यात वाढ झाल्याने खुशीत राहाल. स्वास्थ्य चांगले राहील. अधिक वाचा

सिंह - आळस, थकवा आणि ऊबग कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारी मुळे अस्वस्थता अनुभवाल. नोकरी व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठापासून आज दूर राहण्यातच शहाणपण आहे असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. अधिक वाचा

कन्या - मनावर संयम' हा आजच्या दिवसाचा मंत्र बनवा, असा सल्ला श्रीगणेश देताहेत. स्वभावांतील उग्रता कोणा बरोबर मतभेद करण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. म्हणून जागरूक राहा. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. जलाशयापासून दूर राहा. खर्च खूप होईल. अधिक वाचा

तूळ - रोजच्या कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून तुम्ही पार्टी, सिनेमा किंवा पर्यटन याची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नालिंगी व्यक्ती किंवा प्रियतमा यांच्या सान्निध्यामुळे खूप आनंद होईल. नवीन वस्त्रालंकारांची खरेदी किंवा परिधान करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक मानसन्मान प्राप्त होईल. अधिक वाचा

वृश्चिक - श्रीगणेश म्हणतात की पारिवारिक शांतीचे वातावरण तुमच्या तनमनाल स्वस्थ ठेवील. ठरविलेल्या कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धा आणि शत्रूची चाल निष्फळ जाईल. मातेच्या घराण्याकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होईल. विशेष कामात खर्च होईल. अधिक वाचा

धनु - संततीच्या अभ्यास आणि स्वास्थ्य याविषयीच्या चिंतेने मन कष्टी राहील. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने तुम्ही निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवा असे श्रीगणेश सांगतात. साहित्य, लेखन आणि कला या विषयी रूची वाढेल. प्रिय व्यक्तिंबरोबरची भेट रोमांचक बनेल. अधिक वाचा

मकर - उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबातील सदस्या बरोबर पटणार नाही किंवा तक्रार होईल ज्यामुळे मन खिन्न होईल. वेळेवर भोजन आणि शांत झोप हे मिळणार नाहीत. स्त्रीवर्गाकडून काही नुकसान होईल किंवा काही कारणावरून त्यांच्याशी तक्रार होईल. अधिक वाचा

कुंभ - श्रीगणेश सांगतात की, आज आपण चिंतामुक्त होऊन जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून स्वजना बरोबर आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तिंची साथ व दांपत्यजीवन यात धनिष्ठता अनुभवाल. अधिक वाचा

मीन - आर्थिक नियोजन करण्यासाठी आज शुभ दिवस आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. मिळकत वाढेल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. उत्कृष्ट भोजन मिळेल. स्वास्थ्य ठीक राहील, तसेच मनाचे स्वास्थ्य सुद्धा तुम्ही चांगले टिकवून ठेवाल असे श्रीगणेश म्हणतात. अधिक वाचा
 

Web Title: todays daily horoscope september 25 2021 know what your rashi says rashibhavishya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app