मीन राशिभविष्य 2021 : जोखीम पत्करण्यात पुढाकार घ्याल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 03:46 PM2020-12-17T15:46:42+5:302020-12-17T15:49:35+5:30

Pisces horoscope 2021: ह्या वर्षात भरपूर प्रवास संभवतात. आपल्या प्रवासा दरम्यान समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी परिचय झाल्याने त्याचा आपणास भविष्यात खूप मोठा फायदा होऊ शकेल. आपणास परदेशी स्रोतातून व विदेशी माध्यमांच्या मदतीने मोठा आर्थिक लाभ होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्याची दाट शक्यता आहे.

Pisces horoscope 2021: Pisces Horoscope 2021 in Marathi, Career, Education, Love, Relationship and Health Horoscope, Meen Rashi Bhavishya 2021 | मीन राशिभविष्य 2021 : जोखीम पत्करण्यात पुढाकार घ्याल

मीन राशिभविष्य 2021 : जोखीम पत्करण्यात पुढाकार घ्याल

Next

मीन राशीचे जातक अति संवेदनशील असतात. हीच संवेदनशीलता काहीवेळा त्यांची मोठी शक्ती ठरते तर काहीवेळा मोठी दुर्बलतासुद्धा. वैवाहिक जीवनात पुढे होताना कोणावरही एकदम विश्वास न ठेवण्याची काळजी घेतल्यास आपला विश्वासघात होणार नाही. २०२१ दरम्यान आर्थिक आघाडीवर आपणास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन आपल्या प्राप्तीत वृद्धी होईल. त्यामुळे कोणत्याही आर्थिक समस्येस आपणास सामोरे जावे लागणार नाही. आपले साहस व पराक्रम वाढल्याने कोणतीही जोखीम पत्करण्याची आपली तयारी असेल. ह्याच वृत्तीमुळे आपण व्यापारात प्रगती साधू शकाल. इतकेच नव्हे तर आपण मित्रांनासुद्धा सहकार्य करून त्यांच्या खांद्यास खांदा लावून मार्गक्रमण कराल, व त्यामुळे आपली सामाजिक प्रतिमा उंचावून आपल्या अनुयायांच्या संख्येत भर पडेल. कौटुंबिक वातावरण आशास्पद राहिल्याने कुटुंबियांच्या सहवासात राहण्याची आपणास संधी मिळेल. आपणास ज्या काही गोष्टी समजून घेण्याची इच्छा असूनही अजून समजल्या नसतील त्या सुद्धा आता समजू शकतील. आपल्या वडिलांना काही ना काही शारीरिक त्रास ह्या वर्षात वारंवार होण्याच्या शक्यतेमुळे २०२१ दरम्यान मीन राशीच्या जातकांना आपल्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशी जाण्याचे स्वप्न बाळगून असणाऱ्या जातकांसाठी हे वर्ष विशेष अनुकूल नसल्याने आपण जर थोडा धीर धरलात तरच काही प्रमाणात यश प्राप्त होऊ शकेल. आपणास वडिलोपार्जित संपत्ती ह्या वर्षात मिळू शकेल. हे आपल्या अपेक्षेनुसार असल्याने आपण खूप आनंदित व्हाल. ह्या वर्षात भरपूर प्रवास संभवतात. आपल्या प्रवासा दरम्यान समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी परिचय झाल्याने त्याचा आपणास भविष्यात खूप मोठा फायदा होऊ शकेल. आपणास परदेशी स्रोतातून व विदेशी माध्यमांच्या मदतीने मोठा आर्थिक लाभ होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्याची दाट शक्यता आहे. मीन राशीच्या जातकांना आपल्या आईमुळे बऱ्याच गोष्टीत मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. आपणास स्वतःच्या प्रयत्नानेच चांगले यश प्राप्त होणार असल्याने इतरांवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःवरच विश्वास ठेवावा. त्यामुळे आपला फायदा व आत्मविश्वास सुद्धा वाढेल.

वैवाहिक जीवन (Pisces, Love and relationship Horoscope 2021)

२०२१ चे वर्ष मीन राशीच्या जातकांच्या वैवाहिक जीवनासाठी खूपच चांगले आहे. आपले नाते दृढ होईल तर काही जणांचे वैवाहिक जीवन प्रेम विवाहात सुद्धा परिवर्तित होऊ शकेल. प्रेमासाठी केलेले आपले प्रयत्न ह्या वर्षात यशस्वी होतील. आपणास जर एखादी व्यक्ती आवडत असेल व आपण जर आपल्या भावना त्या व्यक्तीकडे व्यक्त केल्या नसतील तर ह्या वर्षात आपणास त्या व्यक्त करण्याची संधी मिळेल. त्यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने जास्त अनुकूल आहेत. ह्या दरम्यान आपल्या भावना प्रबळ असतील. विवाहितांसाठी २०२१ ची सुरवात काहीशा नाजूकतेने होईल. ह्या दरम्यान आपल्या दोघात काही तणाव निर्माण होऊन समस्येत वाढ होईल. नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. अर्थात हि स्थिती काही काळा पुरतीच असेल. मे महिन्यापासून नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. आपण पूर्व तयारी करून ठेवल्यास सर्व काही सुरळीत होऊन कोणतीच समस्या निर्माण होऊ शकणार नाही.

१२ राशींचे २०२१ चे भविष्य वाचण्यासाठी क्लिक करा! 

आर्थिक (Pisces, Finance Horoscope 2021)

प्राप्तीच्या दृष्टिकोनातून २०२१ ची सुरवात मीन राशीच्या जातकांसाठी चांगली होणार असून आर्थिक बाबतीत आपणास उत्तम परिणाम मिळू शकेल. आपणास नशिबाची साथ मिळून आर्थिक प्राप्ती चांगली होण्यास मदत होईल. वर्षाच्या मध्यास कर विषयक देणी फेडावी लागणार असल्याने आपणास त्याचे नियोजन करून ठेवावे लागेल. मुख्यत्वे ह्या दरम्यान आपल्या प्राप्तीत वाढ झालेली असेल. अशा स्थितीत योग्य ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करावी, जेणे करून योग्य वेळ येता आपणास त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. ह्या दरम्यान आपली थकबाकी मिळण्याची सुद्धा शक्यता असल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल व त्यामुळे आपण आनंदित व्हाल.

नोकरी, व्यवसाय, करिअर (Pisces,Job-Career-Business Horoscope 2021)

मीन राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी २०२१ ची सुरवात चांगली होईल. आपल्या कामावर आपण प्रभुत्व मिळवाल व त्यामुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल. आपणास शासकीय यंत्रणेकडून सुद्धा सहकार्य व लाभ प्राप्त होईल. आपण जर शासकीय नोकरीत असाल तर हे वर्ष आपल्याला चांगले जाईल. तर खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या जातकांसाठी २०२१ चे वर्ष उत्कृष्ठ असेल. त्या नंतर जस जसे दिवस पुढे जातील तस तसा आपल्यावर कामाचा ताण येत राहील. वर्षाच्या उत्तरार्धात आपली नोकरीतील प्रतिष्ठा वाढून आपणास स्थैर्य प्राप्त होईल. मीन राशीचे व्यापारी जातक २०२१ च्या सुरवाती पासूनच आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतील. ही कामे आपणास इमानदारीत प्रगती करण्याची संधी मिळवून देतील. आपणास शासकीय क्षेत्रातून तर लाभ होईलच शिवाय विशेष कर व अन्य क्षेत्रातून सुद्धा काही ना काही फायदा अवश्य मिळेल व त्यामुळे आपण आपल्या व्यापारात वाढ करू शकाल. ह्या वर्षात आपल्या एखाद्या खास व्यक्तीचा सल्ला आपल्यासाठी उपयुक्त ठरेल.

शिक्षण (Pisces, Education Horoscope 2021)

शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मीन राशीच्या विद्यार्थ्यांची २०२१ ची सुरवात चांगली झाली तरी आपली शैक्षणिक स्थिती सतत डळमळीत राहील. ग्रह स्थिती अशी काही आहे की ज्यामुळे विद्या प्राप्तीत आपणास आनंद जाणवेल. आपले मन सुद्धा ज्ञान प्राप्तीचे नवनवीन मार्ग शोधत राहील, परंतु अधून मधून काही स्थिती अशी निर्माण होईल जी आपणास अभ्यासापासून दूर ठेवू शकेल. आपल्या अध्ययनात अडथळे सुद्धा येऊ शकतात. अशा परिस्थितीत आपण जर दृढ मनोबलाने प्रयत्न केलेत तर आपणास नक्कीच यश प्राप्त होऊन परीक्षेत चांगला निकाल लागू शकेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांसाठी हे वर्ष काहीसे प्रतिकूल असून अनेक प्रयत्न करून सुद्धा अपेक्षित यश न मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपले परिश्रम वाढवून योग्य विकल्पाची निवड करावी. आपणास जर विदेशात जाऊन शिक्षण घ्यावयाचे असेल तर परदेशी विश्व विद्यालयात सहजपणे प्रवेश मिळण्याची शक्यता धूसर असल्याने २०२१ ह्या वर्षात आपणास खूप परिश्रम करावे लागतील. आपणास फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

आरोग्य  (Pisces, Health Horoscope 2021)

आरोग्याच्या दृष्टिकोनातून मीन राशीच्या जातकांसाठी २०२१ ची सुरवात चांगली होणार असून आपली तंदुरुस्ती उत्तम राहणार आहे. आपण आपली दिनचर्या नियंत्रित करण्यात यशस्वी व्हाल व त्यामुळे आपले आरोग्य सुद्धा निरोगी राहू शकेल. आपण जर पूर्वी पासून आजारी असाल तर ह्या वर्षी त्यातून आपली सुटका होऊन आपणास नवचैतन्य लाभल्याची जाणीव होईल. ह्या वर्षीच्या मे महिन्या पासून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान आपल्याला पोट, यकृत किंवा गुप्तांगाचे विकार होण्याच्या शक्यतेमुळे आपणास थोडी काळजी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत विशेष काळजी घ्यावी. उर्वरित वर्ष आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले आहे.

Web Title: Pisces horoscope 2021: Pisces Horoscope 2021 in Marathi, Career, Education, Love, Relationship and Health Horoscope, Meen Rashi Bhavishya 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.