Crime: बायकोचं लफडं कळताच पती संतापला; मित्राला ट्रॅक्टरखाली चिरडून मारलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:28 IST2025-12-02T11:26:51+5:302025-12-02T11:28:25+5:30
Rajasthan Bhilwara Murder: राजस्थानमधील भिलवाडा परिसरात आपल्याच मित्राची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली.

Crime: बायकोचं लफडं कळताच पती संतापला; मित्राला ट्रॅक्टरखाली चिरडून मारलं!
राजस्थानमधील भिलवाडा परिसरात आपल्याच मित्राची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. शनिवारी इंदिरा विहार कॉलनीच्या झुडपात पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतेदह सापडला. शवविच्छेदनाच्या अहवालात त्याची हत्या झाल्याची निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मित्रानेच त्याची हत्या केल्याची उघड झाली. मृताचे आरोपीच्या पत्नीशी अनैतिक संबंध सुरू होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली.
स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी कैलाश कुमार बिश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी भिलवाडा येथील इंदिरा विहार कॉलनीच्या झुडपात रस्त्याच्या कडेला एका ४५ वर्षीय पुरुषाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ एक स्कूटर उभी होती. मृताची ओळख महेंद्र (वय ४५, रा. तिलक नगर) म्हणून पटली. पोलीस आणि एफएसएल पथकाने घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले आणि त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो कुटुंबाकडे सोपवण्यात आला.
या घटनेनंतर, मृताच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि पोलिस अधीक्षक धर्मेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. पोलिसांनी २० हून अधिक संशयितांची चौकशी केली. तपासादरम्यान पोलिसांनी बनेडा पोलीस स्टेशन परिसरातील लक्ष्मीपुरा येथील रहिवासी रामेश्वर जाट याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत रामेश्वरने आपला गुन्हा कबूल केला.
हत्येचे कारण
आरोपी रामेश्वर आणि मृत महेंद्र हे चांगले मित्र होते आणि गेल्या सात वर्षांपासून ते एकत्र दुग्ध व्यवसाय करत होते. मृत महेंद्रचे आरोपी रामेश्वरच्या पत्नीशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते. या अनैतिक संबंधांमुळे रामेश्वर खूप संतापला होता. रागाच्या भरात त्याने मित्र महेंद्रला ट्रॅक्टरने चिरडून ठार मारले. पोलिसांनी आरोपी रामेश्वरला अटक केली असून या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.