‘सत्ता हाती असूनही ७० टक्के गरीब मराठ्यांचे काय?’ छत्रपती संभाजीराजेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 08:39 AM2021-10-27T08:39:17+5:302021-10-27T08:39:33+5:30

Sambhaji Raje : निर्णय लवकरच घेतला नाही तर पुणे ते मुंबई  लाँगमार्च होणार हे नक्की, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. किरवली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. 

‘What about 70% poor Marathas despite being in power?’ Chhatrapati Sambhaji Raje | ‘सत्ता हाती असूनही ७० टक्के गरीब मराठ्यांचे काय?’ छत्रपती संभाजीराजेंचा सवाल

‘सत्ता हाती असूनही ७० टक्के गरीब मराठ्यांचे काय?’ छत्रपती संभाजीराजेंचा सवाल

googlenewsNext

कर्जत : ‘मराठा समाजाकडे सत्ता आहे. त्यांच्याकडे बंगले आहेत, किमती गाड्या आहेत. त्यांच्या शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागले. पण आमच्यामध्ये सत्तर टक्के गरीब मराठा आहेत त्यांचे काय? राज्य सरकार व केंद्र सरकार आरक्षणाचा मुद्दा एकमेकांवर ढकलतात. जनजागृतीसाठी व मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी  ही जनसंवाद यात्रा आहे. निर्णय लवकरच घेतला नाही तर पुणे ते मुंबई  लाँगमार्च होणार हे नक्की, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. किरवली येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. 

छत्रपती शाहू महाराजांनी सर्वजण एका छताखाली यावेत, यासाठी आरक्षणे दिली होती. मराठा समाजाला आरक्षणातून का बाहेर जावे लागले? याचे चिंतन करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने मराठा समाज सामाजिक मागास आहे, हे सिद्ध करावे तर केंद्र सरकारने आरक्षणातील ‘दूरवर व दुर्गम’ ही व्याख्या काढून टाकावी म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्याची अडचण दूर होईल. आरक्षणासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशीही मागणी त्यांनी केली. 

संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही 
मराठ्यांकडे सत्ता आहे. त्यांच्याकडे सर्व काही आहे. असे सांगून विरोधकांनी चित्रपटातला निळू फुले न्यायालयात रंगवला. त्यामुळे आरक्षणाला अडचण निर्माण झाली. मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाजाचे अनेक प्रश्न सोडवले. संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. त्यासाठी सकल मराठा समाजाने एकत्र या, असे ॲड. राजेंद्र कोंढले यांनी केले. 

Web Title: ‘What about 70% poor Marathas despite being in power?’ Chhatrapati Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.