उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर धूळखात; महिन्याभरापासून प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:02 AM2020-10-12T00:02:46+5:302020-10-12T00:03:28+5:30

कर्जतमध्ये आरोग्य यंत्रणेचे अपयश

Ventilator dust in sub-district hospital; Neglected by the administration for over a month | उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर धूळखात; महिन्याभरापासून प्रशासनाचे दुर्लक्ष

उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर धूळखात; महिन्याभरापासून प्रशासनाचे दुर्लक्ष

Next

विजय मांडे

कर्जत : ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचा ९ सप्टेंबर रोजी सकाळी आॅक्सिजन वेळेवर न मिळाल्याने, मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर चोहोबाजूंनी टीका होऊ लागली होती. आपल्या चुका झाकल्या जाव्यात, यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून तत्काळ चार व्हेंटिलेटर कर्जत रुग्णालयासाठी पाठवून देण्यात आले. मात्र, महिनाभरापूर्वी पाठविलेले व्हेंटिलेटर आजपर्यंत कार्यान्वित झाले नाहीत. ते चारही व्हेंटिलेटर पडून असून, सध्या धूळ खात आहेत.

पत्रकार संतोष पवार यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने, पवार यांना पनवेल येथे नेण्यात येत होते आणि त्यावेळी कर्जत- पनवेल प्रवासात आॅक्सिजनचा पुरवठा उपलब्ध न झाल्याने पवार यांचे निधन झाले होते. ही घटना ९ सप्टेंबर रोजी सकाळी घडल्यानंतर चोहोबाजूंनी आरोग्य यंत्रणेवर टीका होत असल्याने, रायगड जिल्हा रुग्णालयाकडून कर्जत उपजिल्हा रुग्णालयासाठी लहान आकाराचे चार व्हेंटिलेटर त्याच दिवशी सायंकाळी पाठविण्यात आले. रायगड जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामीण अथवा उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरची व्यवस्था नाही. मात्र, कर्जत उपजिल्हा रुग्णालयानंतर अन्य उपजिल्हा रुग्णालयांना व्हेंटिलेटर पुरविले जाणार होते. ही बाब लक्षात घेता, भविष्यात सर्व उपजिल्हा रुग्णालय हे आॅक्सिजनसह व्हेंटिलेटर बेडसह सज्ज ठेवण्याचा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री यांचा मानस आहे.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात ९ सप्टेंबर रोजी आलेले व्हेंटिलेटर महिना होऊन गेला, तरी कार्यान्वित झालेले नाहीत. त्या दिवशी त्यांची जी स्थिती होती. तीच स्थिती आजही कायम आहे. जर तत्काळ ते सर्व व्हेंटिलेटर कार्यान्वित झाले असते, तर कदाचित कर्जत तालुक्यातील अनेकांचे प्राण वाचले असते.

तत्काळ व्हेंटिलेटर पाठवले-पालकमंत्री
पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूनंतर आम्ही तत्काळ आरोग्य यंत्रणेबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी बोललो व पवार यांचा मृत्यू झालेला असताना, त्याच दिवशी कर्जत उपजिल्हा रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर पाठवून दिले. त्यासाठी आवश्यक स्टाफची मागणी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी राज्याच्या आरोग्य विभागाकडे केली आहे. मात्र, आपण प्रथमच रायगड जिल्ह्याचे मुख्यालय वगळता अन्य ठिकाणी व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करीत आहोत. राज्यात असे कुठेही नाही, परंतु रायगड जिल्ह्यात अशी सुरुवात केली असून, कर्जतबरोबर माणगाव, पेण, महाड, श्रीवर्धन, खालापूर येथील उपजिल्हा रुग्णालय यांनाही व्हेंटिलेटर पुरविले जाणार आहेत, असे पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले.

आम्ही उपजिल्हा रुग्णालयात जागा निश्चित केली होती. मात्र, जिल्ह्याकडून तज्ज्ञ उपलब्ध झाले नसल्याने पुढे काहीही करता आले नाही.
- डॉ.मनोज बनसोडे, कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अधीक्षक

तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सकांना व्हेंटिलेटर चालविण्याची टीम कर्जत उपजिल्हा रुग्णालयासाठी द्यावी, अशी सूचना केली आहे.
- डॉ संजीव धनगावे, उपजिल्हा रुग्णालयाचे सध्याचे प्रभारी अधीक्षक

Web Title: Ventilator dust in sub-district hospital; Neglected by the administration for over a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.