अनलॉकडाउन १.० मुळे रायगड जिल्ह्यात अर्थकारणाला गती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 11:54 PM2020-06-01T23:54:30+5:302020-06-01T23:54:37+5:30

विशेष प्रतिनिधी। लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : पाचवा लॉकडाउन हा खऱ्या अर्थाने अनलॉकडाउन ठरला आहे. केंद्र सरकारने बºयाच बाबींसाठी ...

Unlockdown 1.0 accelerates economy in Raigad district | अनलॉकडाउन १.० मुळे रायगड जिल्ह्यात अर्थकारणाला गती

अनलॉकडाउन १.० मुळे रायगड जिल्ह्यात अर्थकारणाला गती

Next

विशेष प्रतिनिधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : पाचवा लॉकडाउन हा खऱ्या अर्थाने अनलॉकडाउन ठरला आहे. केंद्र सरकारने बºयाच बाबींसाठी शिथिलता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश उद्योग-व्यवसाय सुरू झाल्याचे दिसून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानादेखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगला धाब्यावर बसवल्याचे चित्र होते.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. नागरिकांनी स्वत:ला आपापल्या घरामध्ये क्वारंटाइन करून घेतले होते. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेत सरकारने बरेच निर्बंध लादले होते. त्यामुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, परंतु लॉकडाउन किती काळ लांबवायचा याला मर्यादा घालणे गरजेचे होते. तसे केले नसते तर देशाची आर्थिक घडी अधिक विस्कटली असती. याचसाठी सरकारने पाचव्या लॉकडाउनमध्ये बहुतांश बाबींना व्यवहार करण्याची मुभा दिली आहे.


सरकारी कार्यालयामध्ये १५ टक्के उपस्थिती, तर खासगी कार्यालयांमध्ये १० टक्के कर्मचारी यांची उपस्थिती राहणार आहे. बँका, पतसंस्था, विविध दुकाने, संस्थांचे व्यवहार सुरू झाले. आरटीओ, जिल्हा उपनिबंधक, पोस्टाची पार्सल आणि खासगी पार्सल सेवा, कुरियर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मार्केट सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग तसेच त्यावर अवलंबून असलेल्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अर्थव्यवहारांना गती देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे, मात्र नागरिकांत अद्यापही कोरोनाची दहशत कायम असल्याचेही दिसून आले.


अंतर्गत प्रवासी बस वाहतूक, तसेच अंतर्गत जिल्ह्यातील अन्य वाहतुकीवरही निर्बंध कायम आहेत. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालये कोचिंग क्लासेस, हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, सलून, स्पा, सिनेमागृह, नाट्यगृह तसेच गर्दी होणाºया कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नसल्याने त्यांचे व्यवहार बंद असल्याचे दिसून आले.
कोरोनाबाधित क्षेत्रामध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे, मार्केट आणि मेडिकल स्टोअर सुरू राहणार आहेत. दरम्यान, अनलॉकडाउनमुळे बाजारांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिक तोंडावर मास्क लावल्याचे दिसत होते, मात्र सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले होते.


बँका, पतसंस्था, विविध दुकाने, संस्थांचे व्यवहार सुरू झाले. आरटीओ, जिल्हा उपनिबंधक, पोस्टाची पार्सल आणि खासगी पार्सल सेवा, कुरियर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मार्केट सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग तसेच त्यावर अवलंबून असलेल्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

Web Title: Unlockdown 1.0 accelerates economy in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.