बसपाकडून श्रीवर्धनमध्ये सुमन सकपाळ यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 02:23 AM2019-09-30T02:23:41+5:302019-09-30T02:24:05+5:30

श्रीवर्धन विधानसभेसाठी बसपाकडून सुमन सकपाळ तर महाड विधानसभेकरिता रोहित पारधे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

Suman Sakpal's candidature in Shriwardhan from BSP | बसपाकडून श्रीवर्धनमध्ये सुमन सकपाळ यांना उमेदवारी

बसपाकडून श्रीवर्धनमध्ये सुमन सकपाळ यांना उमेदवारी

googlenewsNext

माणगाव : श्रीवर्धन विधानसभेसाठी बसपाकडून सुमन सकपाळ तर महाड विधानसभेकरिता रोहित पारधे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. सुमन सकपाळ या तळा विभागातील आहेत. रोहित पारधे हे माजरवणे विभागातील तरुण नेते आहेत.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, महाड, श्रीवर्धन, अलिबाग या विधानसभा मतदारसंघासाठी बसपाकडून शनिवारी उमेदवारी जाहीर करण्यात आली. या वेळी झोन प्रभारी राजपाल गावडे, रायगड जिल्हा बसपा अध्यक्ष संजय रूपवते, जिल्हा उपाध्यक्ष रामदास शिंदे, राजेश पहालन, अ‍ॅड. संजय कानडे, जिल्हा प्रभारी अ‍ॅड. अनिल नागदेवे, जिल्हा प्रभारी सुनील गायकवाड, जिल्हा प्रभारी सिद्धार्थ मोरे, पनवेल विधानसभा युनिट अध्यक्ष फुलचंद किटके, सुरेंद्र शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी उमेदवारी घोषित केली.

Web Title: Suman Sakpal's candidature in Shriwardhan from BSP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.