वादळग्रस्तांसाठी राज्य शासनाची सर्वोत्तम मदत; राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत शाळांना पत्रे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 12:44 AM2020-06-28T00:44:28+5:302020-06-28T00:45:03+5:30

मुरुड तालुक्यातील वादळग्रस्त भागातील माध्यमिक हायस्कूलना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमार्फत पत्र्याचे वाटप करण्यात आले.

State government best help for storm victims; Distribution of letters to schools through Nationalist Welfare Trust | वादळग्रस्तांसाठी राज्य शासनाची सर्वोत्तम मदत; राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत शाळांना पत्रे वाटप

वादळग्रस्तांसाठी राज्य शासनाची सर्वोत्तम मदत; राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत शाळांना पत्रे वाटप

googlenewsNext

मुरुड : राज्य शासनाकडून वादळग्रस्तांना आतापर्यंत सर्वोत्तम मदत मिळाली आहे. भविष्यात त्या रकमेत वाढ करण्याचे प्रयोजन आहे. वादळात ज्यांच्या घराचे छप्पर उडाले आहे व ज्यांच्या नारळ-सुपारीच्या झाडांचे नुकसान झाले आहे, अशा व इतर सर्व घटकांना राज्य शासनाकडून जास्त रक्कम देण्यात आली आहे. मीही केंद्र सरकारकडून चांगला निधी प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी मुरुड येथे शनिवारी केले.

यावेळी त्यांच्यासमवेत खासदार डॉ.अमोल कोल्हे, रायगडचे खासदार सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, अतिक खतीब सहजीवन विद्या मंडळाचे चेअरमन फैरोज घलटे आदी मान्यवर उपस्थित होते. मुरुड तालुक्यातील वादळग्रस्त भागातील माध्यमिक हायस्कूलना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमार्फत पत्र्याचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी वादळग्रस्तांना मोठ्या रकमेचे अनुदान शासनाकडून मिळावे, यासाठी शासकीय अध्यादेशाचा अभ्यास करून त्यामध्ये योग्य तो बदल घडवून आणला. त्यामुळेच नुकसानग्रस्तांना चांगली रक्कम प्राप्त होणार आहे

यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, पूर्वीच्या सरकारमध्ये हेक्टरी १८ हजार रुपयेच नुकसानभरपाई मिळत होती, परंतु आमच्या सरकारने हा आकडा ५० हजार केला आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत सुपारी पिकाचा समावेश होणार आहे. त्यामुळे या योजनेत बसणारे सर्व फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

बागायदारांंच्या मदतीसाठी शासकीय अध्यादेश
बगायतदारांचे जास्त नुकसान झाल्याची राज्य शासनाला पूर्ण कल्पना आहे. यासाठीच शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असून, बागायतदारांना जास्त रक्कम मिळण्यासाठी लवकरच शासकीय अध्यादेश निघणार असल्याची माहिती यावेळी खासदार तटकरे यांनी दिली.

Web Title: State government best help for storm victims; Distribution of letters to schools through Nationalist Welfare Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.