श्रीवर्धनच्या दोन गावांची पर्यावरणासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:38 AM2019-09-28T00:38:04+5:302019-09-28T00:38:07+5:30

प्लॅस्टिकमुक्त गाव करण्याची घोषणा : दिवेआगर, नागलोलीत उपक्रम

Shrivardhan's two villages fight for the environment | श्रीवर्धनच्या दोन गावांची पर्यावरणासाठी धडपड

श्रीवर्धनच्या दोन गावांची पर्यावरणासाठी धडपड

Next

दिघी : प्लॅस्टिक हे पर्यावरणावर विघातक परिणाम करत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास थांबवण्यासाठी व प्लॅस्टिकमुक्त गाव करण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर व नागलोली या गावांमध्ये विशेष उपक्रम राबविण्यात आले.

दिवेआगर गावाला निसर्गसौंदर्य लाभले आहे. अस्वच्छतेचा आपल्या पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये याचा विचार करण्यात आला. समुद्रकिनाऱ्यावर होणारा प्लॅस्टिक व इतर कचरा त्यामुळे होणारी अस्वच्छता हे पर्यावरणासाठी धोकादायक बाब ठरत आहे. त्यातूनच गणेशोत्सवामध्ये संपूर्ण पंचक्रोशीतून समुद्रात विसर्जन करण्यासाठी येणाºया गणेशमूर्तींमध्ये ८० टक्के मूर्ती या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या असतात. त्याचे पाण्यात लगेच विघटन होत नाही त्यामुळे विसर्जनानंतर या मूर्तींचे अवशेष व निर्माल्य भरतीच्या पाण्याबरोबर किनाºयावर येऊन सगळीकडे अस्वच्छता पसरलेली असते. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून दिवेआगर ग्रामपंचायतीने घेतलेल्या विशेष सभेमध्ये पुढील गणेशोत्सवात प्लॅस्टर आॅफ पॅरिस गणेशमूर्तींना दिवेआगर समुद्रकिनारी विसर्जन करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा ठरावसुद्धा मंजूर करण्यात आला आहे व स्थानिक मूर्तिकारांना प्लॅस्टर आॅफ पॅरिसऐवजी पाण्यात लगेच विघटन होणाºयाच शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करण्यासंबंधी लेखी पत्र देण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला. या विशेष सभेला सरपंच उदय बापट, माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक शंकर मयेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्लॅस्टिकची विल्हेवाट योग्य प्रकारे लावा-सरपंच
श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम भागातील सात वाडी मिळून वसलेल्या नागलोली ग्रुपग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत उपस्थित ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती नागलोली यांनी प्लॅस्टिकमुक्त गाव करण्यासाठी पुढाकार घेतला.
आपण प्लॅस्टिक आपल्या घरी किंवा परिसरात वापरत असतो. त्याचे दुष्परिणाम माहीत असूनही घरी आणलेले प्लॅस्टिक परिसरात टाकत असतो. या वेळी सर्वानुमते निश्चय करण्यात आला. प्लॅस्टिकमुक्त गाव करण्याची जबाबदारी घेण्यात आली.
आपल्या घरी आणलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट आपण कुठेही न फेकता
कशी लावू शकतो यासाठी ग्रामस्थांना
व शाळकरी मुले या सर्वांना याचे
महत्त्व सरपंच विजय पाडावे यांनी पटवून दिले. या उपक्रमात नागलोली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Shrivardhan's two villages fight for the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.