आक्षी येथील शिलालेखाचे जतन करा; ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:45 AM2020-02-28T00:45:29+5:302020-02-28T00:45:32+5:30

मराठीतील देशातील पहिला शिलालेख; ग्रामपंचायतीमार्फत पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Save the inscription at Akshi | आक्षी येथील शिलालेखाचे जतन करा; ग्रामस्थांची मागणी

आक्षी येथील शिलालेखाचे जतन करा; ग्रामस्थांची मागणी

googlenewsNext

- निखिल म्हात्रे 

अलिबाग : तालुक्यातील आक्षी येथे असलेल्या देशातील मराठी भाषेतील पहिल्या शिलालेखाचे जतन करण्यासाठी ग्रामपंचायत आग्रही आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाकडून या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने शिलालेख आजही रस्त्याच्या कडेला इतिहासाची साक्ष देत आहे. शिलालेखाला सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याचे जतन करण्यास परवानगी मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे; परंतु कोणत्याच यंत्रणेला या शिलालेखाबाबत अभिमान नसल्याने नाराजीचा सूर आहे.

आक्षी गावामध्ये दोन शिलालेख आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे शिलालेख उघड्यावर असल्याने त्यांनी अनेक उन्हाळे व पावसाळे पाहिले आहेत. शिलालेखावरील मजकूर अस्पष्ट होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्न करीत आहे. या शिलालेखाचा अभ्यास करण्यासाठी विविध ठिकाणाहून अभ्यासक येत असतात. मात्र, त्यांना रस्त्यावरच उभे राहून या शिलालेखाचे परीक्षण करावे लागत आहे. रस्त्यावर सतत असणाºया रहदारीमुळे अभ्यासकांना अभ्यास करताना अडचणी येत आहेत. आक्षी स्तंभलेख ते समुद्रकिनाºयावरील जाणाºया रस्त्याच्या बाजूलाच इलेक्ट्रिकच्या डीपीखाली उभा आहे. तेथे जागाही अपुरी असल्याने त्या परिसरात ग्रामपंचायतीला सुशोभीकरणही करता येत नाही. मात्र, या शिलालेखाचा परिसर नेहमीच ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वच्छ ठेवण्यात येत आहे. याबरोबरच शिलालेखाची माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत. याबाबत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सुशोभीकरणाची गरज
मराठी भाषेतील पहिला शिलालेख असल्याने शासनाने त्याचे संवर्धन करण्यासाठी परवानगी देणे गरजेचे आहे.
शासनाने परवानगी दिल्यास या शिलालेखाचे तत्काळ सुशोभीकरण करण्यात येईल. त्यामुळे शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन सुशोभीकरणाला परवानगी द्यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आक्षी गावातील शिलालेख हे मराठी भाषेतील पहिले शिलालेख असल्याने त्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्याच्या सुशोभीकरणासाठी साईनगर परिसरात दगडांचे कोरीव काम करून बांधकाम करण्यात आले आहे.
पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाली तर या शिलालेखाचे जतन करणे शक्य होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीमार्फत सुशोभीकरणाची परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, जिल्हा परिषद रायगड, पुरातत्त्व विभागाकडे लोखी पत्राद्वारे मागणी केली आहे, असे ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकुमार वाळंज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Save the inscription at Akshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.