Rain: मुंबापुरीत कोसळधारा; वरळी हिल रोडवर टेकडीवरील दगड, माती कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 02:29 AM2020-07-04T02:29:14+5:302020-07-04T06:31:05+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता ४ जुलै रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिकसह पुणे जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Rain: A torrential downpour in Mumbai; Rock, soil collapsed on the hill on Worli Hill Road | Rain: मुंबापुरीत कोसळधारा; वरळी हिल रोडवर टेकडीवरील दगड, माती कोसळली

Rain: मुंबापुरीत कोसळधारा; वरळी हिल रोडवर टेकडीवरील दगड, माती कोसळली

Next

मुंबई : देशासह महाराष्ट्राला व्यापलेल्या मान्सूनने मुंबईकडे पाठ फिरवली होती. मात्र त्यानंतर शुक्रवारी दिवसभर कोसळलेल्या पावसाने मुंबईला भिजवले. दुपारी १ नंतर मात्र पावसाचा जोर ओसरला.

पावसामुळे मुंबईत वाहतूक मंदावली. ३८ ठिकाणी पाणी साचल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले. तर, अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने तो काही काळ बंद करून वाहतूक वळवल्याची माहिती उपआयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.
२४ ठिकाणी झाडे कोसळली,

सायंकाळी साडेपाचपर्यंतच्या नोंदीनुसार, कुलाबा येथे १६०.६ तर सांताक्रुझ येथे १०२.७ मिली. पाऊस झाला. सकाळी ८ ते १० या वेळेत समुद्राला भरती होती. या वेळी ४.४१ मीटर उंच लाटा उसळल्या. परिणामी हिंदमाता, कफ परेड, धोबीघाट, भुलाभाई देसाई रोड, बिंदु माधव जंक्शन, चिराबाजार, भायखळा पोलीस ठाणे, ई. मर्चंट रोड, सायन रोड नंबर २४, गांधी मार्केट, अंधेरी सब वे येथे पाणी साचले. ३ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. २४ ठिकाणी झाडे पडली. ९ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. वरळी हिल रोड येथे जरीमरी मंदिराजवळ टेकडीवरील मातीचा काही भाग, दगड खाली कोसळले. सुदैवाने हानी झाली नाही. '

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुण्याला आज रेड अलर्ट
मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी दिवसभर पावसाने धिंगाणा घातला असतानाच आता ४ जुलै रोजीही पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिकसह पुणे जिल्ह्यासाठीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला. तर ५ आणि ६ जुलै रोजी पालघरला आॅरेंज अलर्ट (कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते) असून, येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.

५ ते ६ जुलैदरम्यान मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा मारा सुरूच राहील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, भारतीय हवामान शास्त्र विभागाने शनिवारीही मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यात मुंबईसह पश्चिम किनारपट्टीचा समावेश आहे.

मशीद रेल्वे स्थानकावरील रूळ पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळाजवळील नाल्यामधून पाणी वाहण्यास अडथळा आला. पाण्याचा निचरा न झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील मशीद स्थानकावरील रुळांवर सकाळी ११ च्या सुमारास पाणी साचले. परिणामी, काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या १० ते १५ मिनिटांनी धावत होत्या. पनवेलकडे जाणारी लोकल मशीद स्थानकात थांबली होती. दरम्यान, लोकल सेवा सुरळीत करण्यासाठी वडाळा येथून विशेष लोकल सोडण्यात आली.

बसचा मार्ग बदलला
सकाळी १० ते ११ या वेळेत मलबार हिल, दादर, भायखळा, हाजी अली, सांताक्रुझ, विलेपार्ले, पवई, घाटकोपर, कुर्ला, साकीनाका, वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ, बोरीवली, गोरेगाव येथे पावसाचा जोर वाढला. वरळी नाका, हिंदमाता, धोबीघाट, चिराबाझार यासह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बसची वाहतूक वळविण्यात आली होती.

वातावरण धूसर
सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईवर दाटून आलेल्या ढगांमुळे काळोख झाला होता. शिवाय मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे मुंबईतील वातावरण धूसर झाल्याचे चित्र होते.

Web Title: Rain: A torrential downpour in Mumbai; Rock, soil collapsed on the hill on Worli Hill Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस