रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: अनंत गीते आणि सुनील तटकरेंमध्ये टफफाईट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:20 PM2019-05-23T12:20:16+5:302019-05-23T12:33:20+5:30

 रायगड लोकसभा मतदारसंघात  शिवसेनेचे नेते अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यामध्ये अटीतटीची झुंज सुरू आहे.

Raigad Lok Sabha election results 2019: tough Fight in Anant Geete and Sunil Tatkare | रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: अनंत गीते आणि सुनील तटकरेंमध्ये टफफाईट

रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: अनंत गीते आणि सुनील तटकरेंमध्ये टफफाईट

googlenewsNext

रायगड -  रायगड लोकसभा मतदारसंघात  शिवसेनेचे नेते अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यामध्ये अटीतटीची झुंज सुरू आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये सुनील तटकरे यांनी सुरुवातीला घेतलेली आघाडी मोडून काढत अनंत गीते यांनी आघाडी घेतली आहे. मात्र दोन्ही नेत्यांना मिळालेल्या मतांमध्ये फारसे अंतर नसल्याने या मतदारसंघात टफफाईट सुरू आहे. 

रायगड लोकसभा मतदारसंघात 2014 च्याच निकालाची पुनरावृत्ती होत असून, दोन्ही नेत्यांमध्ये अटीतटीचा मुकाबला सुरू आहे.  आतापर्यंतच्या मतमोजणीचा आढावा घेतल्यास शिवसेनेच्या अनंत गीते यांना 1 लाख 99 हजार 386 मते मिळाली आहेत. तर सुनील तटकरे यांना 1 लाख 93 हजार 348 मते मिळाली आहेत. 

 कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. गेल्या दोन तीन दशकात अपवाद वगळता कोकणात शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघामध्येही गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अनंत गीते हे निवडून आले आहेत. मात्र यावेळी कोकणातील शिवसेनेचा गड अडचणीत असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या अनंत गीतेंसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आज मतदार नेमका काय कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना 3 लाख 96 हजार 178 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना यांना 3 लाख 94 हजार 068 मतं मिळाली होती. त्यावेळी अनंत गीते केवळ 2 हजार 110 मतांनी विजयी झाले होते.  
 

Web Title: Raigad Lok Sabha election results 2019: tough Fight in Anant Geete and Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.