रायगडमध्ये घुमला ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:03 AM2019-09-18T00:03:12+5:302019-09-18T00:03:18+5:30

रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी एकूण ६५० साखरचौथ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.

In Raigad, the alarm of 'Ganpati Bappa Moraya' | रायगडमध्ये घुमला ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर

रायगडमध्ये घुमला ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी एकूण ६५० साखरचौथ गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये सार्वजनिक २९२ आणि खासगी ३५८ गणेशमूर्तींचा समावेश आहे. संततधार पाऊस सुरू असूनही गणेशभक्तांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले.
गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या पहिल्या संकष्टीच्या दिवशी साखरचौथ गणरायाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. गणेशमूर्ती कारखान्यात काम करणारे मूर्तिकार हे गणेश चतुर्थीच्या दिवशी कारखान्यातच व्यस्त असल्याने त्यांना हा सण साजरा करता येत नाही. त्यांनाही सण साजरा करता यावा यासाठी गणेश चतुर्थीनंतर येणाºया पहिल्या संकष्टीच्या दिवशी साखरचौथ गणरायाचा उत्सव ते जल्लोषात साजरा करतात. मात्र, आता या उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. सर्रास हा सण साजरा केला जात आहे. अंगारकी संकष्टीच्या मंगळवारी शहर व ग्रामीण भागात सार्वजनिक मंडळे व घरगुती साखरचौथ बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे.
>सामाजिक बांधिलकी जपणारा गडब येथील मंगलमूर्तीचा गणेशोत्सव
वडखळ : सर्व ग्रामस्थांच्या एकजूटीतून श्री गणेशावरील भक्ती व सामाजिक बांधिलकी जपणारा, पेणमधील गडब-जांभेळा येथील मरुदेवी मंदिराच्या प्रांगणात मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या विद्यमाने सतत सात वर्षे साखरचौथ गणेश उत्सव साजरा केला जात आहे. या पुढेही हा उत्सव साजरा करणार असल्याचा विश्वास मंडळाचे सदस्य व्यक्त करीत आहेत. आजूबाजूच्या गावात साखरचौथ गणेशोत्सव साजरा होत असताना गावातही हा उत्सव साजरा व्हावा, यासाठी येथील तरुणांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना आखली. त्याला ग्रामस्थांनी साथ दिली.
>नांदगाव हायस्कूल येथे ‘पंचक्रोशीचा राजा’ विराजमान
मुरुड : नांदगाव हायस्कूल येथे पंचक्रोशीचा राजा विराजमान झाला आहे. साखरचौथ गणपतीनिमित्ताने येथे दरवर्षी पंचक्रोशीचा राजा या नावाने गणपतीचे आगमन होत असते. या वेळी या गणपती सजावटमध्ये इस्रोच्या माध्यमातून चांद्रयान-२ च्या मोहिमेतील माहिती उत्कृष्ट सजावटीद्वारे मुलांना देण्यात आली आहे. या सजावटीमध्ये जीएसएलव्ही-३ ची प्रतिकृती व प्रग्यान रोव्हरची प्रतिकृती व तारांगणची निर्मिती करण्यात आली होती. देखावा व सजावट प्रतीक पेडणेकर, विजय बनाटे व अमर दरने यांनी उत्कृष्टरीत्या केली.

Web Title: In Raigad, the alarm of 'Ganpati Bappa Moraya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.