भिशीतून कापला जातोय सर्वसामान्यांचा खिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 01:45 AM2019-11-04T01:45:20+5:302019-11-04T01:45:49+5:30

फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ : नियमबाह्य गुंतवणुकीवर दिला जातोय भर; पोलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित

The pocket is being cut off from the wall | भिशीतून कापला जातोय सर्वसामान्यांचा खिसा

भिशीतून कापला जातोय सर्वसामान्यांचा खिसा

googlenewsNext

नवी मुंबई : शहरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या भिशीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या फसवणुकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोने व्यावसायिकांसह घरगुती भिशीचालकांकडून हे प्रकार घडत आहेत. मात्र, उघडपणे आरबीआयच्या नियमांची पायमल्ली करून चालणाºया या आर्थिक व्यवहारातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.

एपीएमसी येथील गुडविन ज्वेलर्सकडून सर्वसामान्यांच्या झालेल्या फसवणुकीत भिशी ग्राहकांचाही समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यापैकी अनेकांनी पाच लाखांहून अधिक रक्कम भिशीच्या स्वरूपात गुंतवलेली होती. त्यानुसार तक्रारीवरून समोर आलेल्या सात कोटींच्या रकमेत सर्वाधिक रक्कम भिसीच्या स्वरूपात जमा केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, भिशीच्या माध्यमातून ज्वेलर्सचालकांकडून फसवणूक झाल्याची शहरातील ही पहिली घटना नसून, यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. त्या माध्यमातूनही सर्वसामान्यांच्या ठेवी जमा करून घेतल्यानंतर ज्वेलर्सचालकांनी रातोरात पोबारा केला आहे.
ज्वेलर्सचालक अथवा खासगी व्यक्तींना आर्थिक ठेवी जमा करण्याच्या कायद्याने अधिकार नाही. यानंतरही केवळ जादा नफ्याचे अथवा इतर फायद्यांचे आमिष दाखवून ज्वेलर्सचालकांकडून भिशी चालवल्या जातात. तसे बोर्डही बहुतांश ज्वेलर्सच्या बाहेर लावल्याचे पाहायला मिळत आहेत. ते पाहून अनेक ग्राहक ऐपतीनुसार जमेल ती रक्कम ज्वेलर्सचालकाकडे जमा करत असतात. ही रक्कम ज्वेलर्सचालकांकडून त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी वापरली जाते. तर ठरावीक कालावधीसाठी काही टप्प्यात ग्राहकांना त्याचा मोबदलाही दिला जातो. मात्र, ठेवीचा आकडा वाढल्यानंतर संबंधिताकडून ठेवीचा अपहार करून पळ काढला जातो. अशा प्रकारे सोनारांनी रातोरात पळ काढल्याच्या घटना मागील काही महिन्यांत नवी मुंबईत अनेक ठिकाणी घडल्या आहेत. तर काही खासगी व्यक्तींकडूनही परिचयाच्या गटागटांत ठरावीक रकमेची भिशी चालवली जात आहे. अशा काही व्यक्तींनीही भिसीची रक्कम लुटून पळ काढल्याची उदाहरणे आहेत. त्यामध्ये अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे.

भिशी, फंडवर कारवाईची गरज
च्बेकायदेशीरपणे चालणाºया गुंतवणुकीत फसवणूक होत असल्याचे माहीत असतानाही अनेक जण पैसा गुंतवतात; परंतु फसवणूक झाल्यानंतर त्याचे खापर यंत्रणेवर फोडतात. त्यामुळे शहरात अवैधरीत्या चालणाºया भिशी व इतर प्रकारच्या गुंतवणुकींवर पोलिसांकडून पाळत ठेवली जाण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: The pocket is being cut off from the wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.