माथेरानमध्ये पर्यटनावरील बंदी उठविल्याच्या वृत्ताने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 01:27 AM2020-07-06T01:27:56+5:302020-07-06T01:28:20+5:30

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्यानंतर, माथेरानमध्ये पर्यटकांना सरसकट बंदी करण्यात आली होती. तेव्हापासून माथेरान बंद आहे.

News of the lifting of the ban on tourism in Matheran | माथेरानमध्ये पर्यटनावरील बंदी उठविल्याच्या वृत्ताने खळबळ

माथेरानमध्ये पर्यटनावरील बंदी उठविल्याच्या वृत्ताने खळबळ

googlenewsNext

माथेरान : मार्च महिन्यापासून माथेरान पर्यटननगरीमध्ये पर्यटकांना येण्यास मनाई केली आहे, ती आजतागायत कायम आहे. मात्र, रविवारी काही वृत्तपत्रांमध्ये माथेरानमध्ये पर्यटनावरील बंदी उठविली, अशा आशयाच्या बातम्या आल्याने माथेरानमध्ये पुरती खळबळ माजली. कोरोनाचा कहर वाढत असताना, अशी परवानगी कशी दिली गेली, याचीच चर्चा सोशल मीडियावर दिवसभर रंगली आहे. तेव्हा माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याशी चर्चा केली असता, असे कोणतेही निर्देश नगरपालिकेला मिळाले नसल्याने, या बातमीमध्ये काही तथ्य नसल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्यानंतर, माथेरानमध्ये पर्यटकांना सरसकट बंदी करण्यात आली होती. तेव्हापासून माथेरान बंद आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना आर्थिक तंगीस सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपासून कर्जत तालुक्याला कोरोनाचा वेढा वाढत असताना, माथेरानकर पोटावर दगड ठेऊन स्वत:च्या कुटुंबाला प्राधान्य देताना, अजूनही पर्यटन बंदी असावी, याकरिता आग्रही आहेत. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारचे कोणतेही स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

काही वृत्तपत्रांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी माथेरानच्या पर्यटनास परवानगी दिल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यांना संपर्क केला असता, असे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केले असून, माथेरानचे पर्यटन सुरू करण्याअगोदर स्थानिकांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
- प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान

Web Title: News of the lifting of the ban on tourism in Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.