शेतीच्या नुकसानीचा खासदारांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:38 PM2019-11-16T23:38:36+5:302019-11-16T23:38:52+5:30

अवकाळीचा फटका; कर्जतमध्ये ३,९२४ हेक्टर शेतीचे नुकसान

MPs review agricultural damage | शेतीच्या नुकसानीचा खासदारांनी घेतला आढावा

शेतीच्या नुकसानीचा खासदारांनी घेतला आढावा

Next

कर्जत : अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतला. शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई मिळावी, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जत तालुक्यात अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे कर्जत तहसील कार्यालयात पोहोचले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, विधानसभा संघटक संतोष भोईर, रोहिदास मोरे, दशरथ भगत, मोहन ओसवाल, संतोष पाटील, सुरेश बोराडे, शिवराम बदे आदी उपस्थित होते. शासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार विक्रम देशमुख, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, महसूल नायब तहसीलदार संजय भालेराव उपस्थित होते.

तालुक्यात १८६ गावे आहेत, १८,०५२ हेक्टर शेतजमीन आहे, त्यापैकी पेरणी झालेले क्षेत्र ८,९९० हेक्टर होते. अवकाळी पावसामुळे कापणी करून ठेवलेले भात भिजले आणि खराब झाले. शेतात पाणी साचल्याने सपूर्ण पीक खराब झाले तर काहींवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला.

जुलै व आॅगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ३,३३२ शेतकऱ्यांचे ९८२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, तर सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये १०,०४६ शेतकºयांचे २,९४२ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. तालुक्यात एकूण १३ हजार ३७८ शेतकºयांचे ३,९२४ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले.

तलाठी, पंचायत समिती कार्यालयातील ग्रामसेवक आणि तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहायक तीनही कार्यालयाने एकत्रित पंचनामे केले आहेत. सर्व पंचनामे पूर्ण झाले असून याबाबतची माहिती शासनाला कळवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार श्रीरंग बारणे यांनी, बाधित शेतकºयांना मदत मिळालीच पाहिजे, क्षेत्राची मर्यादा न ठेवता सरसकट नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, असे सांगितले. सर्व शेतकºयांनी पीक विमा काढला पाहिजे, यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी जनजागृती अभियान राबवावे, अशा सूचना केल्या.

कर्जत तालुका आदिवासी बहूल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात अनेक आदिवासी बांधव वनविभाग किंवा शासकीय जागेत नाचणी, वरीचे पीक घेतात. त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अशा व्यक्तींना विशेष बाब म्हणून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे बारणे यांनी सांगितले.

Web Title: MPs review agricultural damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.