कर्जत घनकचरा प्रकल्पास मंडणगड नगरपरिषद सदस्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:44 AM2019-12-10T00:44:33+5:302019-12-10T00:44:46+5:30

नगरपरिषद उत्पन्नाची घेतली माहिती

Meeting of members of Mandangad NP for Karjat solid waste project | कर्जत घनकचरा प्रकल्पास मंडणगड नगरपरिषद सदस्यांची भेट

कर्जत घनकचरा प्रकल्पास मंडणगड नगरपरिषद सदस्यांची भेट

Next

कर्जत : रत्नागिरीमधील मंडणगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व सदस्यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पास भेट देऊन या प्रकल्पाची पाहणी केली, कर्जत नगरपरिषदेमध्ये कचºयाची कशा प्रकारे विल्हेवाट लावली जाते व त्या माध्यमातून कसे उत्पन्न नगरपरिषदेला उत्पन्न मिळते याविषयीची माहिती घेतली.

कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी नगराध्यक्षा नेत्रा शेरे आणि सर्व सदस्यांनी कर्जत नगर परिषदेच्या इमारतीची ही पाहणी केली, त्यानंतर मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नगरपरिषदेचा घनकचरा प्रकल्प तसेच बायोगॅस प्रकल्प यासंबंधीची माहिती या सदस्यांना दिली. यावेळी सदस्यांनी कर्जत नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पाचे कौतुक करून असा प्रकल्प आपल्याही नगरपंचायतमध्ये राबवण्याचा निश्चय बोलून दाखवला.

कोंझर ग्रामस्थ अध्यक्ष श्रीकृष्ण साठे यांनी या ठिकाणी कचरा डंम्पिग न होता कच-याची विल्हेवाट लागते, घनकचरा प्रकल्प छान आहे बघून समाधान वाटले. मंडणगड नगरपंचायत पाणी पुरवठा सभापती सुभाष सापटे यांनी आम्ही हा प्रकल्प बघून आम्हाला सुद्धा असा प्रकल्प राबविता येईल का? या विचारत आम्ही आहोत. कर्जतचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी कुणाचा विरोध असण्याचे कारण आहे, तुम्ही जर कच-याचे वर्गीकरण केलं तर तुमचा प्रश्न अत्यंत सहज सुटणारा आहे आणि कुठलेही आजूबाजूच्या लोकांना याचा उपद्रव होणार नाही असे सांगितले.

कर्जत नगराध्यक्षा जोशी यांनी कचरा वर्गीकरणास सुरुवातीस नागरिकांचा विरोधात होतो; मात्र नंतर नागरिकच सहकार्य करतात म्हणून आमचा प्रकल्प यशस्वी कार्यरत आहे असे सांगितले. या वेळी मंडणगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष नेत्रा शेरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, स्वच्छता सभापती राहुल कोकाटे पाणीपुरवठा सभापती सुभाष सापटे, माजी नगराध्यक्ष श्रुती साळवी, माजी नगराध्यक्ष प्रियांका शिगवण, नगरसेवक आदेश मर्चंट, नगरसेवक कमलेश शिगवण, नगरसेविका आरती तलार, नगरसेविका वैशाली रेगे, कोंझर गाव ग्रामस्थ अध्यक्ष श्रीकृष्ण साठे, धनंजय तलार, वामन महाजन, सुहास महाजन आदी उपस्थित होते.

Web Title: Meeting of members of Mandangad NP for Karjat solid waste project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.