भरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलल्यास आंदोलन, महेश मोहिते यांचा आरसीएफला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:22 AM2020-07-10T00:22:51+5:302020-07-10T00:23:02+5:30

आरसीएफ कंपनी प्रशासनाने मागील आठ दिवसांपूर्वी नोकर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये मेकॅनिकल इंजिनीअर, केमिकल इंजिनीअर, फायरमन अशा विविध पदांचा सामावेश आहे.

Mahesh Mohite warns RCF against project victims | भरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलल्यास आंदोलन, महेश मोहिते यांचा आरसीएफला इशारा

भरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलल्यास आंदोलन, महेश मोहिते यांचा आरसीएफला इशारा

Next

अलिबाग : आरसीएफ कंपनीने भरती प्रक्रियेच्या काढलेल्या जाहिरातीत प्रकल्पग्रस्तांचा कोणताही मुद्दा घेतला नाही. प्रकल्पग्रस्तांना डावलून आरसीएफ कंपनी प्रशासनाने ही भरती प्रक्रिया केली तर आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते
यांनी पत्रकार परिषदेत दिला
आहे.
आरसीएफ कंपनी प्रशासनाने मागील आठ दिवसांपूर्वी नोकर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये मेकॅनिकल इंजिनीअर, केमिकल इंजिनीअर, फायरमन अशा विविध पदांचा सामावेश आहे. मात्र, या जाहिरातीत प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी, असा कुठेही उल्लेख नाही.
त्यामुळे कंपनीने अगोदर प्रकल्पग्रस्तांच्या जागा निश्चित करून मगच भरती प्रक्रिया घ्यावी; अन्यथा आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभे राहून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
अ‍ॅड. महेश मोहिते म्हणाले, कंपनीचे विस्तारीकरण झाल्यानंतर प्रथम प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल, असे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आता सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांचा कुठेही उल्लेख केलेला नाही, तर भरती प्रक्रियेच्या मुलाखती घेण्याचे काम एका खाजगी कंपनीला दिले आहे. त्यामुळे यामध्ये घोडेबाजारी होणार हे स्पष्ट केले आहे.
आमच्या प्रकल्पग्रस्तांना भरती प्रक्रियेत नोकरीचा हक्क मिळावा म्हणून फर्टिलायझर मिनिस्टर सदानंद गौडा यांच्यासोबत दिल्लीत
जाऊन चर्चा करणार असल्याचे
अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या वेळी
पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट
के ले.

Web Title: Mahesh Mohite warns RCF against project victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.