लॉकडाऊनमुळे बदलले कारखानदारांचे अर्थकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:29 AM2020-08-08T01:29:06+5:302020-08-08T01:29:42+5:30

कारागिरांना फटका : सरकारच्या मूर्तींची उंची कमीच्या आदेशामुळे संभ्रम

Lockdown changed the economy of manufacturers | लॉकडाऊनमुळे बदलले कारखानदारांचे अर्थकारण

लॉकडाऊनमुळे बदलले कारखानदारांचे अर्थकारण

Next

निखिल म्हात्रे।

अलिबाग : मागील वर्षी जिल्ह्यातील झालेली पूर परिस्थिती आणि या वर्षी कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन आणि निसर्ग चक्रीवादळामुळे गणपती कारखानदारांच्या अर्थकरण बदलवून टाकले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी पाठिंबा देत, मूर्तींची उंची कमी करून घेतली आहे. गणेशमूर्तींच्या कच्च्या मालासाठी खर्च झालेले पैसे वाया गेले आहेत. त्यामुळे मूर्तिकारांची आता अर्थिक गणिते बिघडलेली आहेत.

मोठ्या कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजे जानेवारीतच सुरू होते. सुरु वातीला घरगुती गणेशमूर्ती बनवल्या जातात. होळी झाल्यानंतर गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला सुरुवात होते. यंदा याचदरम्यान या व्यवसायात विघ्न आले. कोरोनामुळे अवघा देश ‘लॉकडऊन’ झाला. पर्यायाने सर्वच व्यवसाय ठप्प होऊन गेले. त्याचा मोठा फटका गेले पाच महिने गणेशमूर्ती व्यवसायाला बसतो आहे. घरगुती गणेशमूर्तीचे काम जानेवारीपासून सुरू झाले. मात्र, गणेशमंडळांच्या मूर्तींचे काम सुरू होणार, तेवढ्यातच लॉकडाऊन झाल्याने हे कामच ठप्प झाले आहे. मूर्तींसाठी लागणारा कच्चा मालही येत नाही. त्यातच यंदा आजपर्यंत मोठ्या मूर्तीची आॅर्डरही न आल्याने मूर्तिकार चिंतेत पडले आहेत.
यंदा कोरोनामुळे शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांनी ४ फुटांची मूर्ती, तर घरगुती गणेशमूर्ती ही २ फुटांची असावी, असे आदेश काढल्यावर सगळेच संभ्रमात आहेत.

यंदा एकही आॅर्डर नाही- सागर हजारे
च्दरवर्षी आमच्या कारखान्यात १० ते ११ हजार घरगुती गणेशमूर्ती बनतात. मात्र, यंदा केवळ २ हजार गणेशमूर्ती बनविण्यात आल्या आहेत. कच्चा माल नाही, आॅर्डरही नाही. गणेशोत्सवाबाबत शासनाने अजूनही भूमिका न मांडल्याने मंडळांच्या आॅर्डर्स अजूनही आलेल्या नाहीत. आमच्या मूर्तिशाळेत दरवर्षी २००० मोठ्या मूर्ती असतात. यंदा मात्र, एकही आॅर्डर नाही, असे हमरापूर येथील कारखानदार
सागर हजारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

च्मोठे मूर्तिकार हे जानेवारीपासून मूर्ती घडविण्याच्या कामाला सुरुवात करतात. मात्र, छोटे मूर्तिकार हे वीटभट्टीचे काम संपले की, हे काम सुरू करतात. मात्र, त्यांचे मूर्ती घडविण्याचे काम सुरू होण्यापूर्वीच लॉकडाऊन झाले, त्यामुळे अजूनही त्यांच्या कामाला सुरु वात झालेली नाही. गेल्या दोन वर्षांत सारख्या आलेल्या आपत्तीमुळे आतोनात नुकसान झाले आहे. सरकारने गणपती कारखानदारांसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Lockdown changed the economy of manufacturers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.