Konkan Flood: 'लोकांचे पुनर्वसन अन् जल व्यवस्थापनासाठी सरकार आराखडा तयार करेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 03:14 PM2021-07-24T15:14:35+5:302021-07-24T15:15:32+5:30

निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही.

Konkan Flood: 'Government to prepare plan for rehabilitation of people and water management',CM uddhav thackeray says | Konkan Flood: 'लोकांचे पुनर्वसन अन् जल व्यवस्थापनासाठी सरकार आराखडा तयार करेल'

Konkan Flood: 'लोकांचे पुनर्वसन अन् जल व्यवस्थापनासाठी सरकार आराखडा तयार करेल'

googlenewsNext
ठळक मुद्देपुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यांच नुकसान झालं आहे, त्यांना सरकार सर्वोतोपरी मदत करेल. जल व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय यंत्रणांकडून व्यवस्थित सहकार्य मिळत आहे, सर्वच ठिकाणी आपली पथकं पोहोचत आहेत.

महाड - मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात ४० हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. या गावात अद्यापही बचावकार्य सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर तळीये गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट दिली. त्यावेळी, घडलेल्या दुर्घटना पाहता सरकारकडून पुनर्वसन आराखडा आणि जल मॅनेजमेंट करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही. कालपासून सातारा, सांगली, कोल्हापूर भागात खूप तणाव होता. नद्यांचं पाणी शहरात शिरलं आहे, ते पाहता नद्यांच्या वाहत्या पाण्यासाठी वॉटर मॅनेजमेंटचाही आराखडा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावात दाखल झाले आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी ते पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यांच नुकसान झालं आहे, त्यांना सरकार सर्वोतोपरी मदत करेल. जल व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न आहे. केंद्रीय यंत्रणांकडून व्यवस्थित सहकार्य मिळत आहे, सर्वच ठिकाणी आपली पथकं पोहोचत आहेत. अनेक ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर केलं आहे, अद्यापही जिथं गरज आहे, तेथील नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन करणारीही माणसंच आहेत, त्यांनाही घटनास्थळी पोहोचायला वेळ लागत आहे. पावसाची, वाहत्या पाण्याची अडचण आहे. मात्र, या टीम त्यांचं काम जोमानं करत आहेत, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 

तातडीने मदतीची गरज - फडणवीस

कोकण, पश्चिम महाराष्ट्र विशेषत: महाडनजिक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत तसेच रोखीने आर्थिक मदत सुद्धा राज्य सरकारच्या वतीने लगेच दिली जावी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातत्याने येणारी संकटं पाहता थोडा दूरगामी विचार सुद्धा राज्य सरकारने करण्याची गरज आहे. तळिये गावात घरे नव्याने पण सुरक्षित ठिकाणी बांधून सर्व नागरी सुविधा नागरिकांना निर्माण करून द्याव्यात. असे करताना धोकादायक क्षेत्राबाहेर हे पुनर्वसन असावे, अश्या विविध मागण्या देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. 
 

Read in English

Web Title: Konkan Flood: 'Government to prepare plan for rehabilitation of people and water management',CM uddhav thackeray says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.