दोन लाख फुलझाडांनी बहरणार जेएनपीटी महामार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 11:44 PM2020-07-08T23:44:04+5:302020-07-08T23:44:25+5:30

जेएनपीटी-मुंबई पोर्ट रोड कंपनी बंदरातील वाढती अवजड वाहतूक सुकर व्हावी आणि वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी जेएनपीटीदरम्यान असलेल्या गव्हाण फाटा-जासई-करळ-द्रोणागिरीदरम्यान राष्ट्रीय एनएच-४बी महामार्गावर सात उड्डाणपूल, एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

JNPT highway to blossom with two lakh flowers | दोन लाख फुलझाडांनी बहरणार जेएनपीटी महामार्ग

दोन लाख फुलझाडांनी बहरणार जेएनपीटी महामार्ग

Next

उरण : जेएनपीटी-गव्हाण फाटा आणि कळंबोली-जेएनपीटी-पळस्पे या एनएच-४बी आठ पदरी राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवर नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन लाख विविध प्रकारची आकर्षक शोभिवंत फुलझाडे लावण्यात येत आहेत. या फुलझाडांच्या लागवडीमुळे दररोज या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या १० हजार वाहतूकदार, प्रवासी, नागरिकांचा प्रवास निश्चितपणे डोळ्यांना सुखावह आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती नॅशनल हायवे अ‍ॅॅॅथोरिटीचे अध्यक्ष प्रशांत फेगडे यांनी दिली.

जेएनपीटी-मुंबई पोर्ट रोड कंपनी बंदरातील वाढती अवजड वाहतूक सुकर व्हावी आणि वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी जेएनपीटीदरम्यान असलेल्या गव्हाण फाटा-जासई-करळ-द्रोणागिरीदरम्यान राष्ट्रीय एनएच-४बी महामार्गावर सात उड्डाणपूल, एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे तीन हजार कोटी खर्चाचे काम नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीकडे सोपविण्यात आले आहे. यापैकी उड्डाणपुलाची काही कामे प्रगतिपथावर आहेत. तर उर्वरित जेएनपीटी-गव्हाण फाटा आणि कळंबोली-जेएनपीटी-पळस्पे या एनएच-४बी राष्ट्रीय महामार्गावरील सहा - आठ पदरी ४२ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.

परिसरातील वाढत्या प्रदूषणाचे संतुलन राखण्यासाठी जीव्हीकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गव्हाण फाटा -जासई-करळ-द्रोणागिरीदरम्यान राष्ट्रीय एनएच-४बी महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी महामार्गावरील रस्त्यांच्या दुभाजकावर सुमारे दोन लाख शोभिवंत फुलझाडे लावण्याची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये कन्हेरी फुलझाडांच्या जातीतील बिंटी, बोंगणवेल, टिकोमा, तगर, जास्वंद, पॅरेलॉनकस आदी आकर्षक फुलझाडांचा समावेश आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रस्ते उभारणीसह फुलझाडांची लागवड आणि देखभाल करण्याचे काम जीव्हीकेकडे सोपविण्यात आले आहे. या फुलझाडांच्या लागवडीमुळे दररोज या महामार्गावरून ये-जा करणाºया १० हजार वाहतूकदार, प्रवासी, नागरिकांच्या डोळ्यांना ही वाट सुखावह वाटणार आहे. तसेच जेएनपीटीशी जोडणारे सहा - आठ पदरी रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग फुलझाडांनी बहरणार आहेत.

लाइट्स रिफ्लेक्शनमुळे होणारे अपघात कमी होण्यास मदत
जेएनपीटीदरम्यान असलेल्या गव्हाण फाटा-जासई-करळ-द्रोणागिरीदरम्यान राष्ट्रीय एनएच-४बी महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी महामार्गावरील रस्त्यांच्या दुभाजकावर शोभिवंत फुलझाडे लावण्यात येत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी परस्पर विरुद्ध धावणाºया वाहनांच्या लाइट्सचे रिफ्लेक्शन एकमेकांवर न पडणार नाहीत आणि त्यामुळे रात्रीचे होणारे अपघात कमी होण्यास मदत होईल असे प्रशांत फेगडे यांनी सांगितले.

Web Title: JNPT highway to blossom with two lakh flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.