जेएनपीटी कंटेनर टर्मिनल खासगीकरण प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 01:03 AM2020-12-25T01:03:38+5:302020-12-25T01:04:01+5:30

JNPT : पीपीपीच्या माध्यमातून खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

JNPT Container Terminal Privatization Proposal Approved | जेएनपीटी कंटेनर टर्मिनल खासगीकरण प्रस्ताव मंजूर

जेएनपीटी कंटेनर टर्मिनल खासगीकरण प्रस्ताव मंजूर

Next

- मधूकर ठाकूर

उरण : जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनल खासगीकरणाचा प्रस्ताव दोन कामगार ट्रस्टींच्या (प्रतिनिधी) विरोधानंतरही गुरुवारी झालेल्या बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत ८ विरुद्ध २ मतांनी मंजूर झाला. पीपीपीच्या माध्यमातून खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या वेळी जेएनपीटी प्रशासन भवनासमोर पोलीस, सीएसआयएफ जवानांचा ताफा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता. अध्यक्ष संजय सेठी यांच्यासह दहा ट्रस्टी उपस्थित होते. या बैठकीत खासगीकरणाचा प्रस्ताव चर्चेसाठी येताच कामगार प्रतिनिधी दिनेश पाटील, भूषण पाटील यांनी जोरदार विरोध केला. सुमारे तासभर चाललेल्या बैठकीत प्रस्तावाला विरोध करतानाच कंटेनर टर्मिनल जेएनपीटीने स्वत: चालविण्याचीही मागणी करण्यात आली. मात्र केंद्र सरकारने याआधीच जेएनपीटी कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने कामगार प्रतिनिधींच्या विरोधाची नोंद घेऊन ८ विरुद्ध २ मतांनी अखेर मंजूर करण्यात आला. कामगार प्रतिनिधींनी या कंटेनर टर्मिनलच्या प्रस्तावावर मतदान घेण्याचीही मागणी केली होती. तर बहुमताने प्रस्ताव मंजूर झाल्याने मतदान घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्टीकरण जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिले.

थकीत मालमत्ता कर अदा करणार
- कामगारांसाठी असलेल्या एसव्हीआरएसच्या प्रस्तावावरील काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी प्रस्ताव पुढे ढकलण्याची मागणी मान्य करण्यात आली. तसेच पाच ग्रामपंचायतींचा थकीत असलेला मालमत्ता कर अदा केली जाणार असल्याची माहिती वाघ यांनी दिली.

Web Title: JNPT Container Terminal Privatization Proposal Approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.