माथेरानमध्ये झाला सर्वाधिक पाऊस, किनारपट्टीवरील तालुक्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:25 AM2020-08-08T01:25:52+5:302020-08-08T01:26:40+5:30

बळीराजा सुखावला : किनारपट्टीवरील तालुक्यांना मात्र फटका

The highest rainfall was recorded in Matheran | माथेरानमध्ये झाला सर्वाधिक पाऊस, किनारपट्टीवरील तालुक्यांना फटका

माथेरानमध्ये झाला सर्वाधिक पाऊस, किनारपट्टीवरील तालुक्यांना फटका

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दमदार फटकेबाजी करीत चांगलेच झोडपून काढले आहे. भातपिकासाठी हा पाऊस उपकारक ठरणार असला, तरी या पावसामुळे अनेकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. सर्वाधिक पाऊस माथेरानमध्ये पडला, तर परिसरातील डोंगराळ सुधागड, महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यांमध्येही पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. किनारपट्टीवरील तालुक्यांना उधाणाच्या लाटांचा चांगलाच फटका बसला.

सोमवारी पहाटेपासून सतत पडणाऱ्या पावसाने गुरुवारी दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, सायंकाळी सहा वाजल्यांतर नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. एकूण ३३६५२.१० मिमी पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात झाली. नागोठण्याची अंबा नदी धोक्याच्या पातळीपासून तीन मीटर दूर आहे. नागोठणे आणि पूर हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून दृढ झाले असून, नदीचे पाणी बाजारपेठेत हमखास शिरते. तर शुक्रवारी दुपारपर्यंत महाड विभागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आलेले आहे.
सर्वात कमी पाऊस अलिबाग तालुक्यात ३० मिमी इतका पडला, तर पेण तालुक्यात सारखा ये-जा करणाºया पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फटका बसलेला आहे. अलिबाग
तालुक्यात पडणाºया सतत पावसामुळे काही भागांत रस्त्याच्या लगत असलेली झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही काळ वाहतूकही थांबली होती. मात्र, काही काळानंतर रस्ता
साफ केल्यावर वाहतूकही पूर्ववत करण्यात आली होती. तर अलिबाग शहरातील पीएनपी नगरमधील
मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने, नागरिकांना व वाहनचालकांना रस्ता पार करताना कसरत करावी
लागत होती.

२४ तासांतील पावसाची नोंद

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८०.२८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अलिबाग ३० मिमी, पेण ८० मिमी, मुरु ड ६७ मिमी, पनवेल ४२.६० मिमी, उरण ३७ मिमी, कर्जत ५१.२० मिमी, खालापूर ४७ मिमी, माणगांव ६८ मिमी, रोहा ११८.२० मिमी, सुधागड ८८ मिमी, तळा १०६ मिमी, महाड १४७ मिमी, पोलादपूर १२६ मिमी, म्हसळा ५८ मिमी, श्रीवर्धन ४० मिमी, माथेरान १७८.४० मिमी असे आजचे एकूण पर्जन्यमान १ हजार १८४.४० मिमी इतके असून, सरासरी ८०.२८ मिमी इतकी आहे. आजपर्यंतची एकूण पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी ६५.३९ मिमी इतकी आहे.

Web Title: The highest rainfall was recorded in Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.