Give a package of 2 crore in the district; Demand for fishermen | जिल्ह्यात २०० कोटींचे पॅकेज द्या; मच्छीमारांची मागणी
जिल्ह्यात २०० कोटींचे पॅकेज द्या; मच्छीमारांची मागणी

अलिबाग : अवकाळी पाऊस, क्यार आणि महाचक्रिवादळामुळे रायगड जिल्ह्यातील मासेमारी करणारे, तसेच त्याच्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे तब्बल २०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने आर्थिक पॅकेज मंजूर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाने केली आहे. तसे निवेदन त्यांनी राज्याच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांना गुरुवारी दिले.

राज्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारने दहा हजार कोटी रु पयांची तरतूद केली आहे. मात्र, क्यार वादळ आणि महाचक्रिवादळामुळे मच्छीमारांच्या नुकसानभरपाईबाबत अद्याप कोणतीही भूमिका सरकारने स्पष्ट केलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुदातील क्यार आणि महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाºयांना मासेमारी करण्यासाठी जाताच आलेले नाही. त्यामुळे त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

जिल्ह्यामध्ये एक नौका सहा सिलिंडर व बिगर यांत्रिकी नौकांची संख्याही तीन हजार ४५५ आहे. त्यांचे सुमारे १२७ कोटी दहा लाख तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मच्छीविक्रेतींची संख्या ही सात हजार ४७७ आहे. त्यांचे २० कोटी ७६ लाख २५ हजार ५०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच मच्छी सुकवणारे (महिला) तीन हजार ८१२ अशी संख्या आहे. त्यांना नऊ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांचा फटका बसला आहे.

जिल्ह्यात आठ हजार २३९ खलाशांचे ३४ कोटी ५४ लाख ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अन्य कामगार आणि जाळी विणणाºया दोन हजार ३६४ जणांना चार कोटी ७९ लाख १६ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. असे एकूण १९६ कोटी ४८ लाख २१ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे, असे निवेदनात रायगड जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी नमूद केले आहे.

सरकारने मच्छीमार समाजाला न्याय द्यावा, तरच त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे, अलिबाग मच्छीमार संघाचे अध्यक्ष विजय तांडेल, संचालक सत्यजित पेरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Web Title: Give a package of 2 crore in the district; Demand for fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.