भातपिकाच्या जनुकीय आराखड्यासाठी प्रयत्न- डॉ. संजय सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:00 AM2020-02-04T00:00:05+5:302020-02-04T00:00:26+5:30

कर्जत येथे राज्यातील भात शास्त्रज्ञांची गटचर्चा

Efforts for genetic planning of paddy crop - Dr. Sanjay Sawant | भातपिकाच्या जनुकीय आराखड्यासाठी प्रयत्न- डॉ. संजय सावंत

भातपिकाच्या जनुकीय आराखड्यासाठी प्रयत्न- डॉ. संजय सावंत

Next

कर्जत : प्रत्येक जनुकाचे कार्य समजण्यासाठी जनुकिय आराखडा महत्वाचा आहे, त्यामुळे आराखडा तयार झाल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो, म्हणून विशिष्ट गुणधर्म असलेल्या जाती निर्माण करण्यासाठी ह्यजनुक संपादनह्ण या तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे असे मत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी मांडले. भातपिकाच्या संधोधनासाठी जनुकीय आराखडा तयार करण्यावर विद्यापीठ प्रयत्न करीत आहे असे मत कर्जत येथील कृषी भात संशोधन केंद्रात आयोजित राज्यातील भात शास्त्रज्ञ यांच्या गटचर्चेत डॉ. सावंत बोलत होते.

कोकणात भाताचे संकरित क्षेत्र एकूण भात लागवड क्षेत्राच्या १० टक्के पर्यंत वाढविण्याची नितांत गरज आहे. असे झाल्यास भात शेती फायदेशीर ठरेल. बदलत्या हवामानाच्या दृष्टीने प्रत्येक भात जातीनुसार लागवड पध्दत अवलंबिली जाणे. तसेच उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञानाने कमी उंचीच्या भाताचे वाण आणि कमी आकाराचे दाणे तसेच जमिनीवर न गळणाऱ्या वाणावर संशोधन व्हायला हवे, या प्रकारे संशोधन केले जात आहे असे डॉ सावंत यांनी स्पष्ट केले.

या आराखड्यात किडी आणि रोगांच्या प्रादुर्भावाचे अवलोकन करून कमी कालावधीमध्ये अधिक क्षेत्रावर फवारणी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल असे देखील डॉ सावंत यांनी नमूद केले. शेवटी बोलताना भात आणि कोकण हे समीकरण अबाधित ठेवण्यासाठी शहरामध्ये वास्तव्यास असलेल्या कोकणातील बहुतेक चाकरमान्यांची शेती पडिक होत चालल्याने ती शेती लागवडी खाली आणण्याची गरज आहे आणि त्यातून अधिक उत्पन्न काढण्याची गरज आहे असे आवाहन डॉ संजय सावंत यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. उपस्थित शास्त्रज्ञांचे स्वागत कर्जत भात पैदासकार महेंद्र गवई यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मदार्ने यांनी केले,तर सहायक भात विशेषज्ञ डॉ. प्रवीण वणवे यांनी मानले.

गटचर्चेला मराठवाड्यातून डॉ. अभय जाधव, विदभार्तून डॉ. गौतम श्यामकुवर, डॉ. बाळासाहेब चौधरी, डॉ. मिलिंद मेश्राम, पश्चिम महाराष्ट्रातून डॉ. हेमंत पाटील, डॉ. एन. व्ही. काशीद, डॉ. के. एस. रघुवंशी, सी. डी. सरवंडे,दक्षिण कोकणातून डॉ. भरत वाघमोडे, डॉ. विजय शेट्ये, खार जमीन शास्त्रज्ञ डॉ.एस. बी.दोडके, ए.एस.ढाणे, भाभा अणू संशोधन केंद्राचे डॉ. बी. के. दास आदी भात पिकावर काम करणारे शास्त्रज्ञ प्रामुख्याने उपस्थित होते.

भाताची उत्पादकता १२० टक्क्यांनी वाढली- डॉ. रमेश कुणकेरकर

परिषदेत डॉ.इंदू सावंत यांनी, मधुमेह रुग्णांसाठी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले भात वाण प्रसारित करण्याची गरज प्रतिपादित करीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला तांदूळ ब्रँड नेमने मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.पराग हळदणकर यांनी भाताचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे.

च्क्षेत्र कमी होत असल्याची चिंता व्यक्त करीत विद्यापीठाने विकसित केलेल्या भात जातींमुळे शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्याची गरज प्रतिपादित केली. यावेळी डॉ. मुराद बुरोंडकर आणि डॉ. शिवराम भगत यांची समयोचित भाषणे झाली.

च्प्रास्ताविकात डॉ. रमेश कुणकेरकर म्हणाले की, ५४ वर्षांपासून सलग वार्षिक गट चर्चा होत असून, महाराष्ट्रात आतापर्यंत ६९ भात जाती प्रसारित झाल्या. १९६० पासून २०१९ पर्यंत भाताची उत्पादकता १२० टक्क्यांनी वाढली असून, बारीक दाण्याचे संकरित वाण विकसित करणे काळाची गरज आहे.

Web Title: Efforts for genetic planning of paddy crop - Dr. Sanjay Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.