"ताउत्के" चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:52 PM2021-05-17T12:52:49+5:302021-05-17T12:56:45+5:30

जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

The district administration announced the information about damage due to Tauktae cyclone | "ताउत्के" चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

"ताउत्के" चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

googlenewsNext

रायगड- "तौत्के " चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर  जाणवू लागला. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत आहे. निता नाईक (50 ) या महिलेचा मृत्यु झाला आहे, तर जिल्ह्यात अन्य 2 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. या दरम्यान जिल्ह्यातील आज सकाळी  9.00 वाजेपर्यंत झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

आतापर्यंत एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 839 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. एका व्यक्तीचा मृत्यू व दोन व्यक्ती जखमी झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
 

 

Web Title: The district administration announced the information about damage due to Tauktae cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.