पळसदरीतील तलावात आढळली मेलेली मगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:31 PM2020-02-12T23:31:41+5:302020-02-12T23:32:15+5:30

आणखी मगरी असल्याची ग्रामस्थांची माहिती

A dead crocodile found in a lake in Palsadari | पळसदरीतील तलावात आढळली मेलेली मगर

पळसदरीतील तलावात आढळली मेलेली मगर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : तालुक्यातील पळसदरी येथे असलेल्या रेल्वेच्या तलावात मेलेली मगर आणि कासव सापडले आहेत. वन विभागाने त्या मृत मगरीचे अवशेष जाळून टाकले आहेत. तलावात आणखी तीन मगरी असल्याचे स्थानिक आदिवासींचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या मगरी शोधण्याचे काम वन विभागाने सुरू केले आहे. मात्र, मगरीच्या वावरामुळे स्थानिक आदिवासींमध्ये घबराट पसरली आहे.
कर्जत जवळ असलेल्या पळसदरी रेल्वे स्थानकाच्या वरच्या बाजूला १९५० च्या दशकात मध्य रेल्वेने पाणी साठवण करण्यासाठी तलाव बांधला होता. याच तलावाच्या पाण्यात ११
फे ब्रुवारीलाएक मगर आणि एक कासव हे मृत अवस्थेत आढळून आले होते. त्याची माहिती पळसदरी संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्याकडून कर्जत वनविभागाला रात्री ८ च्या सुमारास देण्यात आली. त्यानंतर वनक्षेत्रपाल नीलेश भुजबळ आणि वनपाल संजय तांबे तसेच वनरक्षक नागरगोजे, गांगुर्डे हे रात्री पळसदरी येथील तलावाजवळ पोहोचले. त्यांनी मृत अवस्थेत असलेल्या मगरीचे अवशेष पाण्याबाहेर काढले आणि मध्यरात्री १ वाजेपर्यंत आणखी काही मगरी आढळून येतात का? याचा शोध घेतला.


बुधवार, १२ फे ब्रुवारीला सकाळी त्या मगरीचे सर्व अवशेष जाळून नष्ट करण्यात आले. चार फूट लांबीची मगर, साधारण दीड वर्षे वयाची असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. दुसरीकडे स्थानिक आदिवासींच्या म्हणण्यानुसार आणखी काही मगरी यापूर्वी दिसून आल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने त्या अन्य मगरींची शोधमोहीम सुरू केली आहे. त्या मगरींना पकडण्यासाठी जाळे वनविभागाने घेतले आहे.

सडलेल्या अवस्थेत मगर
स्थानिक पातळीवर चौकशी केली असता आणि आदिवासी लोकांच्या बोलण्यावरून मगरी कोणीतरी आणून सोडल्या असून, ज्या मगरीचा मृत्यू झाला आहे. मासे मारण्यासाठी कीटकनाशक पाण्यात टाकले जाते, त्यामुळे झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे; परंतु सापडलेली मगर ही सडलेल्या अवस्थेत असल्याने आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असल्याने मगर जाळून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे विषबाधा नक्की कधी झाली याचा शोध लागला नाही.

Web Title: A dead crocodile found in a lake in Palsadari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.