CoronaVirus News : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:51 PM2020-09-14T23:51:37+5:302020-09-14T23:51:54+5:30

संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिवसाला कोरोनाचे ७०० हून अधिक रुग्ण सापडून येत आहेत. जिल्हाबंदी उठवण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे.

CoronaVirus News: More than a thousand people have died due to corona in Raigad district so far | CoronaVirus News : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू

CoronaVirus News : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू

Next

- मयूर तांबडे

नवीन पनवेल : कोरोनामुळे रायगड जिल्ह्यात आतापर्यंतएक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे. यात सर्वाधिक मृत्यू पनवेल महानगरपालिका हद्दीत झालेले असून, त्याचा आकडा ३४४ आहे, तर पनवेल ग्रामीणमध्ये ८६ आणि खालापूरमध्ये ८८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे. सर्वाधिक कमी प्रमाणात मृत्यू तळा येथे ६ आणि म्हसळा येथे १० जणांचा झालेला आहे.
संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिवसाला कोरोनाचे ७०० हून अधिक रुग्ण सापडून येत आहेत. जिल्हाबंदी उठवण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे. दररोजच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कोरोना सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, तर काही ठिकाणी रुग्ण घरीच उपचार घेताना दिसून येत आहेत.
ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, त्यांनी रुग्णालयात उपचार घ्यायला हवे असे आवाहन केले जात आहे. कोरोनाचे संकट अजून काही महिने सुरू राहणार आहे. वाढती रुग्णसंख्या आणि व्हेंटिलेटर, आॅक्सिजन बेडची संख्या अपुरी पडत असल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात आॅक्सिजनची मागणी वाढू लागलेली आहे. आॅक्सिजन बेड आणि आयसीयूच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी रुग्णांची परवड होताना दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सध्या कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, अनेक जण होम क्वारंटाइन होताना दिसून येत आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ पनवेल महापालिका हद्दीत होताना दिसून येत आहे. दोनशे ते अडीचशे रुग्ण रोज सापडून येत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे.

- पनवेल परिसरात आॅक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध होत नसल्याने नेमके रुग्णांनी रुग्णांना न्यावे, तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आॅक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने तुटवडा भासत आहे.

Web Title: CoronaVirus News: More than a thousand people have died due to corona in Raigad district so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.