CoronaVirus News: ना थरावर थर ना खालूचा आवाज घुमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:18 AM2020-08-13T00:18:49+5:302020-08-13T00:19:06+5:30

पोलादपूर : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी ...

CoronaVirus News | CoronaVirus News: ना थरावर थर ना खालूचा आवाज घुमला

CoronaVirus News: ना थरावर थर ना खालूचा आवाज घुमला

googlenewsNext

पोलादपूर : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी खेळण्यात येत असते. मात्र, या वर्षी देशभरात कोरोनासारख्या महामारीने पाय घट्ट रोवले असल्याने सणासुदीवर निर्बंध आले आहेत. थरावर थरासह गावरान खालुबाजाच्या आवाजासह डीजेचा आवाज घुमला नसल्याने शांतता होती. यामुळे बाळगोपाळांचा मात्र हिरमोड झाला आहे. असे जरी असले, तरी घरोघरी श्रीकृष्ण जन्मोत्सवाची पूजा उत्साहात करण्यात आली.

पोलादपूरमध्ये सार्वजनिक ७६ व गुजराती समाजाच्या ७ हंडी दरवर्षी फोडण्यात येतात. मात्र, या वर्षी कोरोनाची सावट लक्षात घेता रद्द करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र, मानाच्या व नवसाच्या हंडी मात्र मोजक्या नागरिकांच्या उपस्थित फोडण्यात आल्या. या वर्षी हा उत्सव रद्द करण्यात आल्याने या वर्षी ना खालूचा आवाज ना डीजेचा सूर ऐकायला मिळणार नसल्याची खंत गोपाळ भक्त व्यक्त करत आहेत.

पनवेलमध्ये साध्या पद्धतीने दहीहंडी उत्सव
पनवेल : पनवेलमध्ये या वर्षी सर्वच सार्वजनिक दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले, तरी शहरवासीयांनी अगदी साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला. सोशल डिस्टन्स पाळत पारंपरिक पद्धतीने दहीकाल्याचा उत्सव साजरा करण्यात आला.
पनवेल शहरातील शेकडो वर्षाची परंपरा असलेली बापट वाडा येथील दहीहंडीही अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. दरवर्षी मोठ्या उत्साहात तरुण एकत्रित येऊन या उत्सवात सहभागी होतात.
प्रशासनाच्या सूचनेनुसार हा दहीहंडी उत्सव मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. शहरात सोसायटीच्या आवारातही अशाच पद्धतीने हा उत्सव पार पडला, तर ग्रामीण भागातही पारंपरिक मानाच्या दहीहंड्या फोडण्यात आल्या.

मंदा म्हात्रे यांनी केली गोवर्धनी मातेची पूजा
बेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिराच्या तेराव्या वर्धपान दिनाचे औचित्य गोकुळाष्टमीनिमित्त बेलापूरच्या आमदार यांनी मंदिरात नवचंडी होम हवनचे आयोजन केले होते. कोरोनाचा नायनाट व्हावा, विस्कळीत झालेले जनसामान्यांचे जनजीवन पूर्ववत व्हावे, सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त व्हावी, अशी श्री गोवर्धनी मातेकडे प्रार्थना केल्याचे मंदा म्हात्रे यांनी कळविले आहे.

लाख मोलाच्या ३६० दहीहंड्यांना यंदा ब्रेक
बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या महापालिकेच्या आठ विभागांत दरवर्षी हा सण मोठ्या जल्लोषात उत्साहात पार पडत होता. लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होत असते. नवी मुंबईत लहान-मोठ्या ३६0 दहीहंड्या बांधल्या जातात, परंतु या वर्षी या सर्व दहीहंड्या रद्द केल्याचे संबंधित आयोजकांनी जाहीर केले होत.

Web Title: CoronaVirus News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.