coronavirus: रायगडमध्ये ४४ पोलीस कोरोनाबाधित, दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:20 AM2020-07-11T01:20:42+5:302020-07-11T01:21:05+5:30

कोरोनाच्या संकटात अहोरात्र झटणाºया पोलिसांमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून, करोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे.

coronavirus: 44 police coron-infected in Raigad, two employees killed | coronavirus: रायगडमध्ये ४४ पोलीस कोरोनाबाधित, दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

coronavirus: रायगडमध्ये ४४ पोलीस कोरोनाबाधित, दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील नागरिकांचा कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा, यासाठी रायगड पोलीस गेल्या चार महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेत आहेत. जनतेचे रक्षण करताना रायगड पोलीस दलातील ४४ कोरोना योद्धे कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. आतापर्यंत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे, तर १७ जण अद्यापही कोरोनाशी झुंज देत आहेत.

कोरोनाच्या संकटात अहोरात्र झटणाºया पोलिसांमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून, करोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाºयांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाºयांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे, अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. यामुळे पोलिसांना कोरोनाची लागण झपाट्याने होत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४४ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. यामध्ये २ पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू झाला असून, १७ जणांवर उपचार सुरू आहेत. २२ पोलीस कर्मचारी व अधिकारी कोरोनामुक्त झाले आहेत. पोयनाडमधील १, मुरुड १, खालापूर १, माणगाव १, पेण १ असे एकूण ५ पोलीस अधिकारी तर नागोठणे २, महामार्ग पोलीस बोरघाट २, माणगाव ४, रोहा १, खालापूर १, तळा १, पोलीस मुख्यालय १ असे एकूण १२ पोलीस कर्मचारी सध्या विविध रुग्णालयांत कोरोनापासून मुक्त होण्यासाठी उपचार घेत आहेत, तर २५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पोलीस वसाहतीमध्ये भीती
पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित होत असल्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही बसत आहे. त्यामुळे पोलीस वसाहतींमध्ये प्रचंड भय आहे. अनेक पोलीस कुटुंबांसोबत संपर्क येऊ नये, म्हणून काही दिवस पोलीस ठाण्यात, तर काही दिवस घरी राहात आहेत.

Web Title: coronavirus: 44 police coron-infected in Raigad, two employees killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.