coronavirus: नेरळजवळील वृद्धाश्रमातील ११ जण कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 11:40 PM2020-07-08T23:40:17+5:302020-07-08T23:40:48+5:30

नेरळनजीकच्या डीग्निटी लाइफस्टाइल या वृद्धाश्रमातील तब्बल ११ जणांना कोरोनाची बाधा झाली असून आत्तापर्यंत तेथे १३ रुग्ण सापडले आहेत.

coronavirus: 11 corona positive, one dies in old age home near Neral | coronavirus: नेरळजवळील वृद्धाश्रमातील ११ जण कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

coronavirus: नेरळजवळील वृद्धाश्रमातील ११ जण कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

Next

कर्जत : तालुक्यात गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र बुधवारी तालुक्यात २५ रुग्ण आढळले. हा आत्तापर्यंतचा उच्चांक आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १८ रुग्ण आहेत. नेरळनजीकच्या डीग्निटी लाइफस्टाइल या वृद्धाश्रमातील तब्बल ११ जणांना कोरोनाची बाधा झाली असून आत्तापर्यंत तेथे १३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तो कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालल्याचे दिसत आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या १९६ वर पोहोचली आहे.

बोरवाडी येथील उत्तरकार्यात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे तीस जणांना कोरोनाची बाधा झाली होती. परंतु नंतर त्यामध्ये वाढ न झाल्याने ती साखळी तुटली होती. मात्र आता नेरळनजीकच्या माणगाव येथील लाइफस्टाइल या वृद्धाश्रमात ५ जुलै रोजी एका ७१ वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला. ७ जुलै रोजी येथील ८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. आणि बुधवार, ८ जुलै रोजी येथील तब्बल ११ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. यामध्ये बाजूच्या आंबिवली गावातील पाच तर माणगावमधील दोन, कोल्हारे, कुंडलज, नेरळ टेपआळी, नेरळ कोंबल वाडी येथील प्रत्येकी एक कामगार आणि दोन कामगार तेथे राहून आहेत. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात दोन महिला आहेत. हे सर्व २० ते ४६ वयोगटातील आहेत.
कर्जत - कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतीमध्ये माणगाव गावाच्या हद्दीत डीग्निटी लाइफस्टाइल नावाने वृद्धाश्रम आहे. येथे १५० ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. सध्या तेथे राहणारे आणि अन्य कामगार यांची संख्या २०० हून अधिक आहे. त्यात कोरोना विषाणूचा संसर्ग हा जेष्ठ नागरिक, वयोवृद्ध आणि अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना त्रासदायक ठरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कर्जतमधील बाधितांचे प्रमाण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण

कर्जत शहरातील दहिवली भागातील कोंकण आळीत राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तो मोहपाडा येथील एका मोबाइलच्या दुकानात काम करीत आहे. दहिवलीतीलच ८३ व ५७ वर्षांच्या व्यक्तींनाही कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील मुद्रे बुद्रूक भागातील २७ वर्षांच्या युवकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

तसेच कडाव या गावात राहणाºया एका ३५ वर्षांच्या अभियंत्याला कोरोनाची बाधा झाली असून तो अभियंता नेहमी अलिबाग येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी जात असे. तो एका राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षांचा सुपुत्र आहे. कडावमधीलच एक जनरल स्टोअर्स चालवणाºया व तेथील बँकेचे बिझनेस करस्पाँडन्सचे काम करणाºया ४२ वर्षीय तरुणाची कोरोना टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह आली असून त्याच्या ६० वर्षीय आईलाही कोरोनाची बाधा झाली आहे.

नेरळ शहरातील एका ४३ वर्षीय महिलेचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ती महिला नेरळ ग्रामपंचायतीच्या माजी सदस्याची पत्नी आहे. पाषाणे गावातील एका ३१ वर्षांच्या तरुणाला कोरोनाची बाधा झाली असून हा तरुण मूळचा आंबिवली येथील आहे. नेरळनजीकच्या ममदापूर गावातील ५४ व ३८ व्यक्तींच्या कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आदिवासी भागात असलेल्या सुगवे येथील ३१ वर्षांच्या युवकालासुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे.

ग्रामपंचायतीने दिले होते पत्र : सरपंच कल्याणी सारंग कराळे यांनी डीग्निटी लाइफस्टाइल या संस्थेला पत्र देऊन सर्व जेष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाच्या कोरोना टेस्ट करण्याची सूचना केली होती. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनीदेखील डीग्निटी लाइफस्टाइल संस्थेच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवून काळजी घेण्याची सूचना केली होती. तर कोरोना पॉझिटिव्ह ७१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने ग्रामपंचायतीने आग्रह केल्यामुळे डीग्निटी लाइफस्टाइलच्या व्यवस्थापनाने तत्काळ आपल्याकडे असलेले ज्येष्ठ नागरिक आणि अन्य कामगार अशा तब्बल २१८ जणांच्या कोरोना टेस्ट करून घेतल्या होत्या.

Web Title: coronavirus: 11 corona positive, one dies in old age home near Neral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.