पडम जवळ एसटीला अपघात, महिला गंभीर तर दोघे किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 01:00 AM2019-09-04T01:00:25+5:302019-09-04T01:00:44+5:30

अनेकांनी केले मदतकार्य : महिला गंभीर तर दोघे किरकोळ जखमी

Accident to ST near Padam | पडम जवळ एसटीला अपघात, महिला गंभीर तर दोघे किरकोळ जखमी

पडम जवळ एसटीला अपघात, महिला गंभीर तर दोघे किरकोळ जखमी

Next

रोहा : महाड-वडपाले येथे एसटीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रोहा-बोरीवली एसटीला अपघात झाला. पडम गावाजवळ रस्त्याच्या कडेला एसटी पलटी झाल्याने काही प्रवासी जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून प्रवासी सुखरूप असून तीन जखमींना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सकाळी या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी मदातकार्य केले.

एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून पलटी झाल्याचे सांगण्यात आले. गाडीत साधारण २० प्रवासी होते. त्यातील तीन प्रवासी जखमी झाले. गाडी पलटी होताच भीतीने चालक पळून गेला. एसटी दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे रोहा तालुका कामगार संघटक अ‍ॅड. हर्षद साळवी, मनोज लांजेकर, योगेश दाखवे, नगरसेवक जुबेर चोगले व ग्रामस्थ मदतीसाठी तत्काळ धावून गेले. जखमींना आणण्यासाठी तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी रुग्णवाहिका अपघातस्थळी पाठविली. दुर्घटनेची माहिती देण्यासाठी मदतकार्य करणाऱ्यांनी संपर्क केला असता डेपो कार्यालयात फोन लागले नाहीत. तर आगारप्रमुखांनी फोन घेतले नाहीत. अखेर रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी एसटी दुर्घटनेची दखल घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या. रोहा पोलीस निरीक्षक राजेंद्र परदेशी यांनी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. या दुर्घटनेत एक प्रवासी महिला गंभीर जखमी झाली आहे.

च्सुरक्षित प्रवासाची हमी देणाºया राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला अपघात होत आहेत. भंगारावस्था तितक्याच धोकादायक गाड्या प्रवाशांच्या दिमतीला आहेत. त्या बसेस खड्डेमय रस्त्यावरून चालविण्याची कसरत चालकांना करावी लागते. तासन्तास खराब रस्त्यावरून गाड्या चालवाव्या लागतात. चालकांना विश्रांती मिळत नाही. दुसरीकडे अनेक चालक बेदरकारपणे गाड्या चालवितात, ओव्हरटेक करतात, अशा सर्व प्रसंगात प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

रोहा आगार प्रशासनाने गाड्या दुरुस्तीबरोबरच चालकांवरील कामांचा अतिरिक्त ताण कमी केला पाहिजे. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असा एसटीचा सुरू असलेला कारभार थांबला पाहिजे.
- अ‍ॅड. हर्षद साळवी, शिवसेना कामगार संघटक, रोहा

Web Title: Accident to ST near Padam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड