पनवेल ग्रामीणमध्ये ९४ ठिकाणे कंटेनमेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:11 AM2020-06-01T00:11:41+5:302020-06-01T00:11:52+5:30

पनवेल परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात जेथे कोरोनाचा रुग्ण सापडतो तो भाग किंवा ती इमारत तातडीने सील करण्यात येत आहे.

94 places containment zones in rural Panvel | पनवेल ग्रामीणमध्ये ९४ ठिकाणे कंटेनमेंट झोन

पनवेल ग्रामीणमध्ये ९४ ठिकाणे कंटेनमेंट झोन

Next

मयूर तांबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : पनवेल महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात जवळपास २०० रुग्ण सापडले आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ग्रामीण भागात ९४ ठिकाणच्या इमारती कंटेनमेंट झोन केल्या आहेत. ग्रामीण भागातील १२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


पनवेल परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात जेथे कोरोनाचा रुग्ण सापडतो तो भाग किंवा ती इमारत तातडीने सील करण्यात येत आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उलवे, करंजाडे, विचुंबे, पाली देवद, देवद, भिंगारवाडी, उसर्ली खुर्द, आकुर्ली, कोप्रोली, शिरढोण, केलवणे, वहाळ, उमरोली, कोन, कसळखंड, आष्टे, पळस्पे, चिखले, चिपळे, नेरे, आदई, दापिवली (वावेघर), वडघर या ठिकाणी २८ दिवसांसाठी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.


कोरोनामुळे ग्रामीण भागातील ९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यातच अजूनही काही जणांच्या अहवालाची प्रतीक्षा कायम असून काहींचे नमुने घेतले जाणार आहेत. ज्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे, त्याच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यामुळे आकडा वाढण्याची भीती कायम आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण हे अत्यावश्यक सेवेतील असल्याने त्यांचे मुंबई कनेक्शन उघड झाले आहे. तर काही पॉझिटिव्ह रुग्णांची कुठल्या प्रकारची ट्रॅव्हल हिस्ट्रीदेखील नाही.
ग्रामीण भागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे येणाºया परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अमित सानप, नायब तहसीलदार दत्ता आदमाने, राहुल सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, गटविकास अधिकारी डी. तेटगुरे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुनील नखाते आदी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. सर्वात जास्त रुग्ण उलवे येथे असून रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय पनवेल, एमजीएम कामोठे, इंडिया बुल्स कोन, सेवनहिल्स रुग्णालय, मुंबई, डी.वाय. पाटील नेरूळ, हिंदुजा, मुंबई, सायन रुग्णालय, गॅलेक्सी रुग्णालय, मुंबई, तेरणा, नेरूळ, सीसी सेंटर ठाणे, रिलायन्स रग्णालय, कोपरखैरणे येथे उपचार सुरू आहेत.


उलवे येथे २४ इमारती, करंजाडे येथे १५, विचुंबे येथे १३, पाली देवद येथे ११, देवद येथे २, भिंगारवाडीत १, उसर्ली खुर्द ६, आकुर्लीत १, कोप्रोली २, शिरढोणमध्ये १, केळवणेत १, वहाळ १, उमरोलीत २, कोन १, कसळखंड ३, आष्टेमध्ये २, पळस्पेत २, चिखलेत १, चिपळे १, नेरे १, आदईत १, दापिवली (वावेघर) १, वडघर १ अशा एकूण ९४ इमारती कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आल्या आहेत.

कोरोनाची लागण रोखण्याकरिता ग्रामीण भागात शासनाकडून उपाययोजना करण्यात येतात. यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास तो परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला जातो. २८ दिवस हा परिसर सील केला जातो. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करण्यात येतात. मेडिकल, दूध, किराणा दुकान सुरू राहण्यास परवानगी आहे. रुग्ण आढळलेल्या इमारतीतील रहिवासी बाहेर व बाहेरील व्यक्ती आत येण्यास मज्जाव आहे. कंटेनमेंट झोनमध्ये आधी परिसर सील केला जायचा, मात्र रहिवाशांची गैरसोय आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन केवळ इमारत सील करण्यात येत आहे.
- दत्तात्रय नवले, प्रांताधिकारी, पनवेल

Web Title: 94 places containment zones in rural Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.