स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी कुरवडे गावात धावली एसटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 01:41 AM2019-08-16T01:41:35+5:302019-08-16T01:41:47+5:30

भारत देशाला आज स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे पूर्ण झाली. कुरवडे गाव हे महामार्गापासून दोन किलोमीटर असून, आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त कुरवडे व वडगाव गावात एसटी धावली.

72 years after independence,ST ran in Kurvade village | स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी कुरवडे गावात धावली एसटी

स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी कुरवडे गावात धावली एसटी

googlenewsNext

माणगाव  - भारत देशाला आज स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे पूर्ण झाली. कुरवडे गाव हे महामार्गापासून दोन किलोमीटर असून, आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त कुरवडे व वडगाव गावात एसटी धावली. या वेळी येथील ग्रामस्थांनी या एसटीचे उस्फूर्त स्वागत केले. ही बस माणगाव-कुरवडे-साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक-वडगाव - गोरेगाव अशी धावणार आहे. दिवसातून दोन फेऱ्या होणार आहेत. माणगाव तालुक्यातील वडगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत कुरवडे, वडघर, वडगाव व वडगाव कोंड अशी गावे येतात.

मात्र, या भागात देश स्वतंत्र होऊन अद्याप एसटी धावलीच नाही; परंतु माणगाव पंचायत समिती सभापती सुजित शिंदे व माजी सभापती राजेश पानावकर यांच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी एसटी सेवा चालू करण्यात आली. या सेवेचे स्वागत करून ग्रामस्थांनी आगार व्यवस्थापक सुनील वाकचौरे, सहायक वाढवल, चालक व वाहक यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. या कार्यक्रमप्रसंगी माजी सभापती महेंद्र तेटगुरे, माजी सरपंच जगदीश भोकरे, सुषमा पानावकर व जिल्हा परिषद बांधकाम अभियंता वाले उपस्थित होते.

Web Title: 72 years after independence,ST ran in Kurvade village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड