गाढी नदीतील ५०० टन गाळ काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:13 AM2020-06-01T00:13:21+5:302020-06-01T00:13:30+5:30

चिंचपाडा परिसरातील रहिवाशांना दिलासा : अतिवृष्टीत किनाऱ्यालगतच्या गावांना धोका

500 tons of silt was removed from Gadhi river | गाढी नदीतील ५०० टन गाळ काढला

गाढी नदीतील ५०० टन गाळ काढला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल परिसरातून वाहणाºया गाढी नदीतील गाळ काढण्यात येत आहे. चिंचपाडा परिसरात गेल्या १५ दिवसांत जेसीबीच्या साहाय्याने नदीतील ५०० टन गाळ काढण्यात आला. पावसाळ्यात नदीपात्रातील पाणी आजूबाजूच्या गावांत शिरू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यामुळे चिंचपाडा येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.


पनवेल तालुक्यातून कासाडी, गाढी, काळुंद्रे आणि पाताळगंगा या चार नद्या वाहतात. या नद्यांपैकी गाढी नदी महत्त्वाची मानली जाते. माथेरानच्या डोंगरातून उगम पावणाºया नदीकिनारी ग्रामीण तसेच शहरी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. माथेरानमध्ये पडलेला पावसाचे सर्वच पाणी गाढी नदीला मिळते. अनेकदा अतिवृष्टीमुळे नदी धोक्याची पातळी ओलांडते. लोकवस्ती जवळच असल्याने नदीपात्रात अतिक्रमण तसेच कचरा, डेब्रिज मोठ्या प्रमाणात टाकले जाते. त्यामुळे नदीपात्र लहान झाले आहे. त्यामुळे थोड्या पावसानेही किनाºयालगतच्य गावांत पाणी शिरते.


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जेएनपीटी महामार्गाच्या रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी गाढी नदीवरही पूल बांधण्यात आला आहे. नदीतील गाळ काढण्यात येत आहे. यासाठी अशोका ठेकेदार कंपनीकडून काम केले जात आहे.

च्पंधरा दिवसांत गाढी नदीतून जेसीबीच्या साहाय्याने ५०० पेक्षा जास्त टन गाळ काढण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
च्गाळ काढल्याने नदीपात्र मोठे झाले आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी बाहेर ओसंडून जवळ असलेल्या गावात पाणी शिरण्याची भीती कमी झाली आहे.

Web Title: 500 tons of silt was removed from Gadhi river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.