२८ पोलीस अंमलदारांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:37 AM2020-11-27T00:37:26+5:302020-11-27T00:37:47+5:30

पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान

28 police officers promoted | २८ पोलीस अंमलदारांना पदोन्नती

२८ पोलीस अंमलदारांना पदोन्नती

Next

अलिबाग : रायगड जिल्हा पोलीस दलातील २८ पोलीस अंमलदार यांना पदोन्नती मिळाली आहे. याबाबतचे आदेश २४ नोव्हेंबर निर्गमित करण्यात आले आहेत. या पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते बुधवारी सन्मानित करण्यात आले.

रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण २८ पोलीस अंमलदार यांना २४ नोव्हेंबर रोजी पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी १७ पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर, ९ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर तर २ पोलीस शिपाई यांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यानुसार बुधवारी (२५ नोव्हेंबर) पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सर्व पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदार यांना शुभेच्छा देऊन पदोन्नतीच्या पदातील स्टार लावून सन्मानित केले. 

Web Title: 28 police officers promoted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.